लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी: मोदी वाराणसीतून, अमित शाहांनी कापलं अडवाणींचं तिकीट, महाराष्ट्रातली 16 नावं

शाह, मोदी, गडकरी

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात 182 उमेदवारांचा समावेश आहेत. अपेक्षप्रमाणे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा उभे राहणार आहेत.

  • गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहे. गांधीनगरमधून यापूर्वी लालकृष्ण अडवाणी या मतदारसंघातून निवडणूक लढवायचे.
  • नितीन गडकरी नागपूरमध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसच्या नाना पटोलेंशी होणार आहे.
  • लखनौमधून गृहमंत्री राजनाथ सिंह निवडणूक लढवणार आहेत.
  • अमेठीतून स्मृती इराणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात लढणार आहेत.
  • मथुरामधून हेमा मालिनी निवडणूक लढवणार आहेत.
  • लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अनेक ज्येष्ठांना घरी बसवलं जाईल, अशी शक्यता माध्यमांमधून व्यक्त होत आहे.
  • काँग्रेसने आतापर्यंत सहा याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
line
line

महाराष्ट्रातली 16 नावं जाहीर

महाराष्ट्रातली 16 नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यात दोन विद्यमान खासदारांची तिकिटी कापण्यात आली आहेत. अहमदनगरचे दिलीप गांधी आणि लातूरचे सुनील गायकवाड यांची तिकिटं कापण्यात आली आहेत.

ईशान्य मुंबईमधून किरिट सौमय्या यांचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)