बोईंग 737 मॅक्स विमानांवर भारतात बंदी आली आहे, कारण...

फोटो स्रोत, Boeing
इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातही नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद तात्पुरता करण्याचा निर्णय घेतला आहे.
"विमानामधील त्रुटी दूर करून त्यात सुधारणा होत नाही तोवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही," असंही डीजीसीएनं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग 737 मॅक्स 8 विमानाला रविवारी भीषण अपघात झाला होता. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता.
रविवारी झालेल्या अपघातात 157 जण ठार झाले. या अपघातानंतर बोईंग 737 मॅक्स या विमानातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
बोईंग 737 मॅक्स 8 काय आहे?
बोईंग ही एक अमेरिकनं कंपनी आहे. ही कंपनी विमानं, उपग्रहं आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचं काम करते.
कंपनीच्या वेबसाईटनुसार, कंपनीकडे खालील विमानं आहेत.
- नेक्स्ट-जनरेशन 737
- 737 मॅक्स
- 747-8
- 767
- 777
- 777X
- 787
यांपैकी बोईंग 737 मॅक्स या विमानाचा व्यावसायिक वापर 2017मध्ये सुरू करण्यात आला.

यावेळी कंपनीनं म्हटलं होतं की, "प्रवाशांना सुखद हवाई प्रवासाचा अनुभव घेता येईल अशापद्धतीनं बोईंग 737 मॅक्सची रचना करण्यात आली आहे."
737 मॅक्समध्ये एकूण 4 मॉडेलचा समावेश होतो.
- 737 मॅक्स 7
- 737 मॅक्स 8
- 737 मॅक्स 9
- 737 मॅक्स 10
737 मॅक्स 7 ची आसनक्षमता 172 तर 737 मॅक्स 10ची 230 इतकी आहे. 737 मॅक्स 7 अन्य मॉडेलहून अधिक अंतर पार करू शकतं.
हे विमान 7130 किलोमीटर एवढं अंतर पार करू शकतं.
ही वेळ का आली?
रविवारी बोईंग 737 मॅक्सच्या विमानाला भीषण अपघात झाला होता आणि त्यात 157 जण ठार झाले होते. उड्डाणानंतर काही क्षणातच विमान क्रॅश झालं आणि हा अपघात घडला.
त्यानंतर भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं बोईंग 737 मॅक्स विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, बोईंग 737 मॅक्स विमानं सुरक्षित आहेत.
असं असलं तरी, अमेरिकेतल्या Association of Flight Attendantनं Federal Aviation Administrationकडे विनंती केली आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेत 737मॅक्स विमानांच्या उड्डाणास स्थगिती देण्यात यावी.
EU Aviation Safety Agencyनंही या विमानांचा वापर थांबवला आहे. सावधगिरीच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी लायन एअरलाईन्सच्या बोईंग मॅक्स विमानानं जकार्ताहून उड्डाण घेतल्यानंतर लगेच अपघात घडला होता. यात 189 लोकांनी जीव गमावला होता.
हा अपघात होण्यापूर्वी 3 महिनेआधीच त्यांनी बोईंग मॅक्सला त्यांच्या ताफ्यात सामील केलं होतं.
भारतातील स्पाईसजेट आणि जेट ऐयरवेज या विमान कंपन्या बोईंगच्या या मॉडेलचा वापर करतात.
स्पाइसजेट 737 मॅक्स या मॉडेलचा वापर करतं. यामुळे इंधन खर्चात 15 लाख डॉलरची बचत होते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
भारतावर काय परिणाम?
'द टाईम्स ऑफ इंडिया'च्या बातमीनुसार, सरकारच्या आदेशामुळे स्पाइसजेटच्या 13 बोईंग 737 मॅक्स विमानांना मंगळवारी रात्री उड्डाणास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसंच यामुळे जेट एयरवेजच्या 119 पैकी 54 विमानं उड्डाण घेऊ शकणार नाहीत.
यामुळे देशातल्या विमान प्रवासाचा दर वाढू शकतो, असंही बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, BOEING
याशिवाय पायलटच्या अपुऱ्या संख्येमुळे इंडिगोने एप्रिल महिन्यापर्यंत दररोज 30 विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत. गो एयरनंसुद्धा काही उड्डाणं रद्द केली आहेत.
स्पेयर पार्टच्या कमतरतेमुळे एअर इंडियाची सुद्धा 23 विमानं उड्डाण करू शकणार नाहीत. या सर्व बाबींमुळे विमान प्रवासाचे दर वाढण्याची शक्यता आहे, असं बातमीत म्हटलं आहे.
विमानाची विशेषता काय?
1967मध्ये कंपनीनं मॅक्स मॉडेल बाजारात आणलं. 2017मध्ये या विमानानं पहिल्यांदा उड्डाण घेतलं.

फोटो स्रोत, BOEING
यंदा 737 मॅक्स 8 आणि 9 सेवेत दाखल झाले आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत 737 मॅक्स 10ला सेवेत आणण्याची कंपनीची योजना आहे.
बोईंग 737 हे अरुंद विमान आहे. एका आसनासाठी या विमानात कमी जागा लागते. तसंच या विमानाला कमी इंधन लागतं. बोईंगच्या इतिहासात या मॉडेलची विक्री सर्वाधिक झालेली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








