एसटी बसमध्ये विमानासारखी सेवा देणारे कंडक्टर सोपान जवणे
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे सध्या एसटीची सेवा बंद आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, की राज्यातील एक एसटी कंडक्टर एसटीतच विमानासारखी सेवा देतात. सोपान जवणे त्यांचं नाव. जवणे यांच्याविषयी बीबीसी मराठीनं 2017मध्ये केलेली ही स्टोरी पुन्हा शेयर करत आहोत.
खरं तर एसटीमध्ये विमानासारखी सेवा मिळणं प्रवाशांसाठी एक सुखद अनुभव असतो. गेली 15 वर्ष अव्याहतपणे ही सेवा देणारे एसटी कंडक्टर सोपान जवणे यांनी अनोखा आदर्श जपला आहे.
एसटीच्या श्रीगोंदा आगारात कार्यरत असलेले सोपान जवणे हे एसटी प्रवासादरम्यान केवळ प्रवाशांची नुसती तिकिटच फाडत नाहीत, तर विमानातील कॅबिन क्रू मेंबर्सप्रमाणे प्रवाशांना प्रवासाबद्दलची माहिती आणि स्वच्छतेचं महत्त्व सुध्दा सांगतात.
श्रीगोंदा-नाशिक आणि श्रीगोंदा-जळगाव या गाडीवर ते कार्यरत आहेत.
दर शुक्रवारी दुपारी 12 वाजता ते श्रीगोंदा येथून औरंगाबादमार्गे रात्री जळगावला जातात. जळगावमध्ये रात्री मुक्काम करून पुन्हा सकाळी 6 वाजता औरंगाबादमार्गे श्रीगोंद्याला जातात.

जवणे प्रवाशांची तिकिट काढत असतानाच, सूचना देण्यास सुरुवात करतात.
यामध्ये गाडी कुठून कुठे जात आहे, चालक आणि वाहक यांची नावं, बस क्रमांक, तसंच तिकिटाचे दर काय आहेत याची माहिती त्यांच्या या अनाउंसमेंटमध्ये असते.
तिकिट तसंच सुटे पैसे तपासून घ्या, गाडी स्वच्छ ठेवा, कचरा करू नका, खिडकी बाहेर हात काढू नका अशा अनेक सूचना ते प्रवाशांना देतात.

जवणे यांना ही कल्पना कशी सुचली असं विचारलं असता ते सांगतात, "2004 ला एसटीची 13 टक्के भाडेवाढ झाली, प्रवाशांच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी पत्र लिहीली. त्यात काहींनी एसटीच्या अनेक त्रुटी दाखवल्या होत्या.
"एक पत्र माझ्या वाचनात आलं. मला वाटलं की या प्रवाशाला ज्या सेवा हव्या आहेत त्या आपण देऊ शकतो. त्यातूनच मी 2005 पासून हे सुरू केलं."
जवणे यांचा हा अभिनव उपक्रम प्रवाशांनाही खूप आवडतो. काही प्रवासी तर मुद्दाम याच बसनं प्रवास करणं पसंत करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









