IAF : भारतीय वायुदलाच्या हल्ल्याच्या व्हायरल व्हीडिओचं सत्य - फॅक्ट चेक

फोटो स्रोत, SM VIRAL VIDEO GRAB
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
सोशल मीडियावर व्हायरल झालेला आणि अनेक भारतीय न्यूज चॅनेल्सवर दाखवला जाणारा भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकचा व्हीडिओ 26 फ्रेब्रुवारीच्या पहाटेचा नसून जुना आहे.
मीडियामध्ये या एअर स्ट्राईकची बातमी आल्यानंतर #Surgicalstrike2, #IndianAirForce आणि #Balakot सारख्या हॅश टॅगसह हा व्हीडिओ ट्वीट केला जात आहे. पाकिस्तानी सोशल मीडियानुसार हा व्हीडिओ 22 सप्टेंबर 2016 चा आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK SEARCH
सप्टेंबर 2016मध्ये यूट्यूबवर टाकण्यात आलेला हा व्हीडिओ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधला असल्याचं सांगितलं जात आहे.
व्हीडिओमध्ये काही विमानं इस्लामाबाद शहरावर गस्त घालताना दिसत आहेत. तसंच त्यापैकी एक विमान 'लाईट प्लेअर' सोडताना दिसत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार हामीद मीर यांच्या 22 सप्टेंबर 2016च्या ट्वीटवरून पाकिस्तानी वायू सेनेनं इस्लामाबादच्या आकाशात ही गस्त घातल्याचं स्पष्ट झालं आहे.
सप्टेंबर 2016मध्ये आलेल्या मीडिया रिपोर्ट्स नुसार जेव्हा 18 सप्टेंबर 2016च्या दिवशी उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली तेव्हा पाकिस्तानी विमानानी इस्लामाबादमध्ये फायटर विमानांच्या लँडिंगचा अभ्यास केला होता.
यावेळी पाकिस्तानी वायू सेनेनं त्यांची विमानं लाहोर-इस्लामाबाद हायवेवर उतरवण्याचीसुद्धा प्रॅक्टीस केली होती.
दुसरा व्हिडिओ
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मोहम्मद जिया उल हक यांचा मुलगा इजाज़ उल-हक यांनी 24 फ्रेब्रुवारी 2019 ला सकाळी 10 वाजता एक ट्वीट केलं. "गेल्या रात्री फोर्ट अब्बास भागात मी सव्वा दोनच्या सुमारास फायटर विमानांचा आवाज ऐकला त्यामुळे खळबळ निर्माण झाली. ती सीमा ओलांडून आलेली भारतीय विमानं होती की त्यांचा पिच्छा करणारी पाकिस्तानी विमानं?"
इजाज़ उल-हक यांनी हे ट्वीट हारुनाबादमधून केलं आहे. जे बालाकोटपासून खूपच दूर दक्षिणेला आहे.

फोटो स्रोत, TWITTER
इजाज़ यांच्या ट्वीटला उत्तर देताना असद नावाच्या एका व्यक्तीनं एक व्हीडिओ ट्वीट केला. पण हा व्हीडिओ 25 फेब्रुवारीला पहाटे 1.21 वाजता पोस्ट करण्यात आला म्हणजेच एअर स्ट्राईकच्या दाव्याच्या एक रात्री आधी.
पाकिस्तानी सोशल मीडियावर याला पाकिस्तानी वायू सेनेचं शौर्य म्हणून शेअर केलं जात आहे.
तसंच काही फेक फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातलं नेमकं तथ्य काय?
भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या सगळ्यांत मोठ्या कट्टरवादी तळांवर हल्ला केल्याचं भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मात्र या हल्ल्यासंदर्भात कोणतीही छायाचित्रं त्यांनी जारी केली नाहीत. मात्र उजव्या विचारसरणीच्या अनेक पेजेसवर हवाई आक्रमणाचे कथित फोटो वेगाने शेअर केले जात आहेत.
फेसबुक तसंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून हजारो, लाखोवेळा हे फोटो शेअर केले जात आहेत.
मात्र वेगाने सैरावैरा पसरणाऱ्या या फोटोंचा मंगळवारी पहाटे झालेल्या हवाई आक्रमणासाठी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
फोटो क्रमांक 1
पहिल्या फोटोत तीन ट्रेनिंग कॅम्प्स आणि जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक मसूद अझर याची कंट्रोलरुम आहे. जैशने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
पाकिस्तानात अशा स्वरुपाच्या हल्ल्यासाठी हवाई दलाचा प्रथमच सहभाग होता असं फोटोबरोबरच्या माहितीत म्हटलं आहे. मात्र हे सत्य नाही कारण 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानात आक्रमण केलं होतं.
व्हायरल होत असलेला हा फोटो भारतीय हवाई दलाच्या याच वर्षी झालेल्या वायु शक्ती कार्यक्रमादरम्यानचा आहे. फेब्रुवारीतच राजस्थानमधील पोखरण इथं हा कार्यक्रम झाला होता. असोसिएडेट प्रेसच्या अजित सोलंकी यांनी हा फोटो काढला होता.
फोटो क्रमांक 2
पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाचं विमान बॉम्ब टाकत असतानाचा फोटो व्हायरल होतो आहे. मात्र या हल्ल्याचा आणि आजच्या हल्ल्याचा परस्परसंबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
2014 मध्येही हा फोटो व्हायरल झाला होता. इस्रायलने गाझामध्ये केलेल्या ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज या मोहिमेचे हे फोटो आहेत असा दावा केला जात आहे.
मात्र हा काल्पनिक फोटो असल्याचं स्पष्ट झालं आहे. 2012 मध्ये रोमस्थित डेव्हिड सेनसिओटी यांच्या 'द अव्हिएनिश्ट' या ब्लॉगसाठी हा फोटो तयार करण्यात आला आहे. F15 या तेहरानस्थित छोट्या तळावर कसा हल्ला घवू शकतो याची प्रचिती घडवणारा हा फोटो होता.
फोटो 3
नव्या कबरीसाठी अभिनंदन पाकिस्तान अशा कॅप्शनसह एक फोटो व्हायरल होत आहे.
हा फोटो प्रत्यक्षात 2018 मधला सीरियातला आहे. हिम शिन्शर केमिकल वेपन स्टोरेज साईट या ठिकाणी अमेरिकाप्रणित आघाडीने हल्ला केला होता. हा फोटो असोसिएटेड प्रेसचा आहे.
अमेरिका, इंग्लंड तसंच फ्रान्स या देशांनी 105 क्षेपणास्त्र डागल्याचं म्हटलं आहे. त्यांचं लक्ष्य सीरिया होतं. सीरियाच्या कथित रासायनिक अस्त्रांना रोखण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता.
फोटो 4
मंगळवारी पहाटे झालेल्या हल्ल्यासंदर्भात आणखी एक फोटो शेअर केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात हा फोटो राजस्थानमधील पोखरण इथला असल्याचा स्पष्ट झालं आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पोखरण इथं युद्धसराव झाला होता. त्याचे हे फोटो आहेत.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे अमित दवे यांनी हा फोटो काढला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1

YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)