नितीन गडकरी यांची काँग्रेस नेते वारंवार स्तुती का करत आहेत?

राहुल गांधी आणि नितीन गडकरी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी आणि नितीन गडकरी

लोकसभेच्या सत्रात भाजपचे मध्य प्रदेशातले खासदार गणेश सिंह उभे राहिले आणि त्यांनी एक प्रस्ताव मांडला. नितीन गडकरी यांनी केलेल्या चांगल्या कामांचं कौतुक सभागृहाने करावं, असं ते म्हणाले.

त्यांच्या या प्रस्तावाचं स्वागत सभागृहाकडून झालं. भाजपच्या खासदारांनी आनंदाने आपल्या बेंचवर थाप मारली पण सर्वांत जास्त कोणती गोष्ट सर्वांच्या लक्षात राहिली असेल तर ती म्हणजे सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप खासदारांची दिलेली साथ.

खरगे आणि सोनिया गांधी यांनी गडकरींच्या कामाला दिलेली ती एक प्रकारची पावती होती. पण त्यांची ही कृती फक्त एका विरोधी पक्षातील नेत्याच्या कौतुकापुरती मर्यादित होती का?

गेल्या काही दिवसांपासून गडकरी काही वक्तव्यांमुळे सतत बातम्यांमध्ये आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता म्हणून गडकरींकडे पाहण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं दिसतं अशी चर्चा माध्यमांमध्ये आहे.

तसं पाहायला गेलं तर ही कृती म्हणावी तितकी सहज नव्हती, कारण काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी एक ट्वीट करून नितीन गडकरी यांची स्तुती केली होती. "भाजपमध्ये हिंमत असलेला एकमेव नेता," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

त्यांच्या या ट्वीटनंतर नितीन गडकरींनी म्हटलं की "मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मध्यंतरी राहुल गांधी आणि नितीन गडकरी यांनी प्रजासत्ताक दिनाची परेड नवी दिल्लीत एकत्र बसून पाहिली होती.

नितीन गडकरींची जी स्तुती काँग्रेसकडून होत आहे, त्याला काही राजकीय अर्थ आहे का, असं विचारलं असता पुढारीचे पत्रकार उदय तानपाठक सांगतात, "नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची स्तुती करण्याची संधी काँग्रेस सोडत नाही, कारण प्रत्येक विरोधी पक्ष असंच वागतो. पंतप्रधान मोदी आणि गडकरी यांच्यात दरी आहे, असं दाखवण्यासाठी ते त्यांची स्तुती करतात. पण गडकरी यांनी त्यांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. कधीकधी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो."

गडकरी हे मोदींना पर्याय, असं काँग्रेसला वाटतंय?

नितीन गडकरी यांची काँग्रेस नेते स्तुती का करत आहेत, असं विचारलं असता काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत सांगतात, "भाजपमध्ये सत्य बोलायची हिंमत मोजक्याच नेत्यांमध्ये आहे आणि गडकरी त्यापैकी एक आहेत. जर ते खरं मांडत असतील तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत करण्यात गैर काहीच नाही."

गडकरी आणि मोदी

फोटो स्रोत, Getty Images

मोदींना भाजपमधील पर्याय म्हणून गडकरींकडे काँग्रेस नेते पाहतात का, असं विचारलं असता सावंत सांगतात, "पुढच्या निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव होईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचं सरकारच येणार नसेल तर त्यांना पर्याय म्हणून पाहण्याचा प्रश्नच कुठे येतो?"

विरोधी पक्षातील नेते गडकरी यांची स्तुती करतात तेव्हा त्यावर तुम्हाला काय वाटतं, असं विचारलं असता भाजप खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी या विषयावर काहीही मत मांडण्यास नकार दिला.

नितीन गडकरी यांना काय वाटतं?

त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाल्यानंतर गडकरी सभागृहात म्हणाले की "एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की माझ्या मंत्रालयाने केलेल्या कामाबद्दल सर्व पक्षातील नेते आपले मतभेद बाजूला ठेऊन आम्हाला दाद देत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की गडकरींमध्ये हिंमत आहे. तेव्हा गडकरींनी राहुल यांना प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले, "मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की एका राष्ट्रीय पार्टीचे अध्यक्ष असूनदेखील आमच्या सरकारवर हल्ला बोलण्यासाठी तुम्हाला मीडियाने ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा आधार घ्यावा लागत आहे. हे मोदी आणि आमच्या सरकारचं यश आहे की आमच्यावर हल्ला करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या खांद्याची गरज पडत आहे."

पुढे ते म्हणतात की, "आमच्या आणि काँग्रेसच्या DNAमध्ये हाच फरक आहे की आमचा लोकशाहीवर आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास आहे. तुमचे डावपेच आता चालणार नाहीत. मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी देशाला पुढं नेऊ. पण भविष्यात तुम्ही जबाबदारीने वागाल, एवढीच मी आशा करतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)