EXCLUSIVE: उत्तर प्रदेशातल्या दंगली आणि एन्काऊंटरबद्दल काय आहे योगी आदित्यनाथ यांचा दावा?

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेशात आपच्या सरकारच्या काळात एकही फेक एन्काऊंटर न झाल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीबीसीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मानवाधिकार आयोगाच्या नियमावलीनुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी काम करणं बंधनकारक असल्याची आम्हाला जाणीव असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, पोलिसांवर हल्ला कुणी केला तर तो कायद्याचा भंग ठरतो हे सांगायलाही आदित्यनाथ विसरले नाहीत.
याचबरोबर गोहत्या, दंगली तसंच अल्पसंख्य नागरिकांना वाटत असलेल्या भीतीबद्दलही आदित्यनाथ यांनी भाष्य केलं. आदित्यनाथ यांची सविस्तर मुलाखत तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.
'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता.
बीबीसी विश्व बुलेटीन पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




