'द क्विंट'चे मालक राघव बहल यांच्या प्रतिष्ठानांवर आयकर खात्याचे छापे

राघव बहल

फोटो स्रोत, RAGHAV BHL FACEBOOK

फोटो कॅप्शन, राघव बहल

'द क्विंट' या न्यूज वेबसाईटचे मालक, नेटवर्क-18चे संस्थापक आणि पत्रकार राघव बहल यांच्या नॉयडामधील घरी आणि कार्यालयावर गुरुवारी आयकर विभागानं छापे टाकले.

'द क्विंट'नं एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'द क्विंट'चं कार्यालय, मुख्य संपादक राघव बहल तसंच त्यांच्या पत्नी आणि कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रितू कपूर यांच्या घरावर छापे टाकले आहेत.

शिवाय, बंगळुरूतल्या 'द न्यूज मिनिट'च्या कार्यालयातही आयकर अधिकारी पाहणी करत आहेत.

'द न्यूज मिनिट' या न्यूज वेबसाईटच्या सहसंपादक धन्या राजेंद्रन यांनी याप्रकरणी आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं सांगितलं आहे. द न्यूज मिनिटमध्ये 'द क्विंट' आणि राघव बहल यांची भागीदारी आहे.

राघव बहल यांनी या छाप्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. एडिटर्स गिल्डला पाठवलेल्या एका निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, "हा छापा टाकण्यात आला तेव्हा मी मुंबईला होतो आणि पत्रकारितेशी संबंधित कोणत्याही ईमेल किंवा कागदपत्राला हात लावू नका, अशी मी त्यांना विनंती केली आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

कार्यालयातल्या पहिल्या मजल्यावर चौकशीचं काम सुरू असून दुसऱ्या मजल्यावर पाहणी सुरू आहे, असं आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

शिवाय, नॉयडाच्या त्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. रितू कपूर यांनी केलेल्या एका ट्वीटनुसार अधिकारी त्यांच्या फोन तसंच इतर गॅजेट्समधला डेटा कॉपी करण्याच्या प्रयत्न करत होते.

आयकर चोरीसंबंधी हे छापे टाकण्यात आले आहेत आणि अशा प्रकारचे छापे अनेक व्यावसायिकांच्या कार्यालयात टाकण्यात येत आहेत, असं PTI या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

"आयकराशी संबंधित नियमांचं पालन झालं की नाही याची अधिकारी चौकशी करू शकतात. पण या अधिकाराचा उपयोग सरकारवर टीका करणाऱ्यांना धमकावण्यासाठी केला जाऊ नये," असं एडिटर्स गिल्डनं एका निवेदनात म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

एडिटर्स गिल्डचे प्रमुख आणि 'द प्रिंट' वेबसाईटचे संपादक शेखर गुप्ता यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी हा छापा म्हणजे 'धमकी' आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

ही कारवाई म्हणजे मीडियाला धमकावण्याचा प्रयत्न आहे का, असं माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना विचाल्यानंतर ते म्हणाले की, "आम्ही पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. एखादा मीडिया समूह भ्रष्टाचारात सहभागी असेल तर त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल."

राघव बहल हे राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधलं एक मोठं नाव आहे. जवळपास 25 वर्षांपूर्वी त्यांनी नेटवर्क-18 ही कंपनी थाटली, ज्याअंतर्गत CNN-IBN (आजचं CNN-न्यूज18), IBN-7 (आजचं न्यूज18 इंडिया), CNBCआवाज (आजचं CNBC-TV18), MTV, ColorsTV सारखे अनेक चॅनेल येतात.

2014 साली रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी हा माध्यमसमूह बहल यांच्याकडून विकत घेतला. त्यानंतर बहल यांनी 'द क्विंट' या न्यूज पोर्टलची स्थापना केली. शिवाय अमेरिकेच्या ब्लूमबर्ग संस्थेबरोबर त्यांनी 'ब्लूमबर्ग क्विंट' हे व्यापार चॅनल सुरू केलं आणि द न्यूज मिनिट या प्रामुख्याने दक्षिण भारतावर वार्तांकन करणाऱ्या न्यूज पोर्टलमध्ये भागीदारी घेतली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)