पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर, 11 डिसेंबरला फैसला

फोटो स्रोत, PTI
मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगाणा या पाच राज्यात 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात मतदान होईल आणि पाचही राज्यातील मतमोजणी 11 डिसेंबरला होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केल्या.
पाचही राज्यातल्या निवडणुकांची प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. या घोषणेनंतर पाचही राज्यात अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तेलंगणा ती विधानसभा बरखास्तीपासूनच लागू झालेली आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितलं.
छत्तीसगढमध्ये 12 नोव्हेंबर रोजी दक्षिण छत्तीसगढमधल्या 18 विधानसभा मतदारसंघात मतदान होईल. तर उरलेल्या 72 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल.
मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व मतदारसंघात 28 नोव्हेंबरला मतदान होईल. तसेच, राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यात 7 डिसेंबर रोजी मतदान होईल.
या सर्व राज्यात मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
वेळ का बदलली?
आज दुपारी 12.30 निवडणूक आयोग ही घोषणा करणार होतं. मात्र ही वेळ बदलून 3.30 वाजता ही घोषणा करण्यात आली. त्यावरून काँग्रेसने भाजपावर टीकास्त्र सोडलं. त्याबद्दलच स्पष्टीकरण निवडणूक आयुक्तांनी दिलं. काही तांत्रिक कारणे आणि कोर्टाचे निकाल यामुळे ही वेळ बदलावी लागली, असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत म्हणाले.
राजकीय पक्षांना सगळ्यात राजकारण दिसतं, त्यामुळे त्यावर आपल्याला काही बोलायचे नाही, असंही रावत यांनी स्पष्ट केलं.
वेळापत्रक
पाच राज्यांतील मतदानाच्या आणि मतमोजणीच्या तारखा खालीलप्रमाणे :
पक्षीय बलाबल
पाच राज्यातील सध्याचं पक्षीय बलाबलावर एक नजर टाकूया -
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








