एअर होस्टेस आईच्या निरोप समारंभाची लेक वैमानिक

फोटो स्रोत, Twitter/CARAMELWINGS
निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमान प्रवासात मुलगीच पायलट असावी, अशी इच्छा एअर इंडियाच्या एका एअरहोस्टेसची होती आणि ती पूर्ण झालीही!
पूजा चिंचणकर हे निवृत्त झालेल्या एअरहोस्टेसचं नाव. त्यांनी 38 वर्षं एअर इंडियात नोकरी केली. पूजा यांची मुलगी अश्रिता हिनं व्यावसायिक वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्या दिवशीच्या एअरबस ए-319 या विमानाची ती को-पायलट झाली.
पूजा चिंचणकर यांचं काल एअरहोस्टेस म्हणून त्या दिवशी शेवटचं फ्लाईट होतं. त्यामुळे या माय-लेकींच्या खास क्षणाचे साक्षीदार त्या फ्लाईटमधले सगळेच होते. क्रू मेंबर्स आणि प्रवासीही.
विमानानं उड्डाण करण्यापूर्वी अश्रितानं एक ट्वीट केलं होतं. त्यात तिनं म्हटलं होतं की, "एअर इंडियामध्ये एअर होस्टेस असणाऱ्या आईची इच्छा होती की शेवटच्या दिवशी विमानाचं उड्डाण मी करावं. ती मला पूर्ण करता येतेय. मी स्वत:ला भाग्यवान समजते."
"38 वर्षांच्या नोकरीनंतर ती आज निवृत्त होत आहे. तिचा हा वारसा मी पुढे सुरू ठेवेन," असंही तिनं पुढे म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अश्रिताच्या या ट्विटला रिट्विट करत एअर इंडियानेही लिहिलं, "अश्रिता तुला आणि तुझ्या आईला आजच्या फ्लाईटसाठी शुभेच्छा. जेव्हा त्या बॅटन तुझ्या हातात देतील तेव्हा तुला अभिमानाने आपल्या प्रवाशांची सेवा करण्याची संधी मिळेल. हा वारसा खरंच पुढे चालत राहील."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
त्यानंतर अश्रिताने एक व्हीडिओ शेअर करत एअर इंडियाच्या क्रू आणि सर्व प्रवाशांचे आभार मानले आहे. तसंच, हा व्हीडिओ शेअर करत असताना मी माझं काम करत होते, असंही स्पष्ट केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
अश्रिताचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं असून आता सगळीकडे या माय-लेकीचीच चर्चा आहे. अगदी माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी देखील रिट्वीट करत शुभेच्छा दिल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
आतापर्यंत या ट्वीटला हजारो रिट्वीट्स आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत.
अनेकांनी या माय-लेकीचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5

X पोस्ट समाप्त, 6
तर काहींनी त्यांची कहाणी शेअर केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
हेही वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)