कर्नाटक निवडणूक 2018 : #BBCNewsPopUp टीम जाणून घेणार बेंगळुरूचा मू़ड
कर्नाटकमधल्या निवडणुकांचा बिगूल वाजला असून राज्यात निवडणुकीचं वारं जोरात वाहत आहे. डोसा आणि फिल्टर कॉपीभोवती फिरणारी चर्चा आता काँग्रेस सत्ता कायम राखेल काय, याचा अंदाज लावण्याकडे सरकली आहे.
12 मे रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे.
कर्नाटकमधून कोणत्या प्रकारच्या बातम्या बीबीसीनं कव्हर कराव्यात हे विचारण्यासाठी #BBCNewsPopUp टीम कर्नाटकमध्ये पोहोचली आहे.
पारंपरिकरीत्या प्रसारमाध्यमं त्यांच्या निवडणूक कव्हरेजचा संपादकीय अजेंडा ठरवतात. पण आम्ही बीबीसीच्या वाचकांना त्यांचे प्रश्न आमच्या माध्यमाद्वारे मांडण्याची संधी देत आहोत.

यंदा कर्नाटकच्या युवकांकडून आम्ही तिथले स्थानिक प्रश्न जाणून घेतले.
बेंगळुरू शहराला 'भारताची सिलिकॉन व्हॅली' म्हटलं जात असलं तरी ते प्रामुख्यानं पाण्याची कमतरता, कचऱ्याचा प्रश्न, ट्रॅफिक, प्रदूषण आणि खराब रस्त्यांसारख्या मुद्द्यांमुळे बातम्यांत झळकत असतं.
1 कोटी 10 लाख लोकसंख्या आणि आपल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात विस्तारणाऱ्या बेंगळुरूवरचा दिवसेंदिवस भार वाढत आहे.

अस्तित्वाच्या राजकारणासोबतच या शहराचा तामिळनाडूसोबत असलेला पाण्याचा वाद, कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि शेती संकट, हे प्रश्न निवडणुकीवर प्रभाव टाकत आहेत.
काँग्रेस आणि भाजप दोन्हीही पक्ष राज्यातल्या लाखो युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांची मतं कुणाच्या पारड्यात पडतील. हे आत्ताच सांगणं अवघड आहे.
कर्नाटकच्या तरुण मतदारांच्या मनात काय?
13 एप्रिल रोजी इंदिरा नगरच्या 'द हमींग ट्री बार' आयोजित केलेल्या आमच्या 'टाऊन हॉल इव्हेंट'मध्ये सहभागी व्हा. तुमच्या कल्पना आमच्यासोबत शेअर करा. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

बीबीसी न्यूजच्या वेबसाईटवर तुमची स्टोरी आयडिया प्रत्यक्षात आण्ण्यासाठी ही तुमची संधी आहे.
#BBCNewsPopUp आणि #KarnatakaElections2018 हे हॅशटॅग वापरून तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आमच्या संपर्कात राहू शकता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









