गूगल डूडलवर आलेल्या पहिल्या भारतीय महिला फोटोग्राफर कोण होत्या?

भारतीय स्वातंत्र्यापूर्वीचे आणि नंतरचे अनेक ऐतिहासिक प्रसंग होमी यांनी आपल्या कॅमेऱ्यानं टिपले होते.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, भारतीय स्वातंत्र्यापूर्वीचे आणि नंतरचे अनेक ऐतिहासिक प्रसंग होमी यांनी आपल्या कॅमेऱ्यानं टिपले होते.

भारताच्या पहिल्या महिला छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला 104वा जन्मदिन होता. यानिमित्ताने गूगलनं डूडलद्वारे त्यांचा सन्मान केला. पण त्या नेमक्या होत्या कोण? चला जाणून घेऊया.

होमी यांचा जन्म 1913मध्ये गुजरातच्या नवसारीमध्ये झाला.

शनिवारचं गूगल डूडल

फोटो स्रोत, Google

फोटो कॅप्शन, शनिवारचं गूगल डूडल

शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या होमी यांनी त्यानंतर व्यावसायिक फोटोग्राफीला सुरुवात केली.

'ब्रिटिश इंडियाची फाळणी व्हावी की नाही' यासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या चर्चेप्रसंगी होमी उपस्थित होत्या.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, 'ब्रिटिश इंडियाची फाळणी व्हावी की नाही' यासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या चर्चेप्रसंगी होमी उपस्थित होत्या.

स्वत:च्या डोळ्यांनी ब्रिटिशांचा निरोप समारंभ पाहणारे अनेक होते. पण त्यांच्यापैकी 21व्या शतकात जिवंत असलेल्या काही मोजक्या लोकांमध्ये होमी यांचा समावेश होता.

भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांचा होमी यांनी त्यावेळी घेतलेला हा फोटो.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांचा होमी यांनी त्यावेळी घेतलेला हा फोटो.

संपूर्ण कारकीर्दीत होमी यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, भारतभेटीवर येणाऱ्या विदेशातील पाहुण्यांची आणि ऐतिहासिक प्रसंगांची छायाचित्रं टिपली आहेत.

यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, भारतातले शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन, दलाई लामा आदी व्यक्तींचा समावेश होतो.

1956 साली सिक्कीमधून उंच पर्वतरांगा ओलांडून भारतात आलेल्या दलाई लामा यांचे हे छायाचित्र होमी यांनी घेतले आहे.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, 1956 साली सिक्कीमधून उंच पर्वतरांगा ओलांडून भारतात आलेल्या दलाई लामा यांचं हे छायाचित्र होमी यांनी घेतले आहे.

"जवाहरलाल नेहरूंचे फोटो घेणं मला सर्वाधिक आवडायचं," असं होमी यांनी अनेक मुलाखतींत सांगितलं होतं.

1950 सालच्या प्रजासत्ताक दिनी तीन मूर्ती भवन येथे नेहरुंचा होमी यांनी घेतलेला हा फोटो.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, 1950 सालच्या प्रजासत्ताक दिनी तीन मूर्ती भवन येथे नेहरुंचा होमी यांनी घेतलेला हा फोटो.

"नेहरूंच्या कार्यक्रमाला मी नेहमी उपस्थित राहायचे. तू इथं पण आलीस? असं मला बघितल्यानंतर नेहरू म्हणायचे."असं होमी यांनी 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' या वृत्तसंसथेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

दिल्लीत 1950 मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जवाहरलाल नेहरूंचा पारव्याला आकाशात सोडतानाचा हा फोटो होमी यांनी टिपला आहे.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, दिल्लीत 1950 मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जवाहरलाल नेहरूंचा पारव्याला आकाशात सोडतानाचा हा फोटो होमी यांनी टिपला आहे.

पारशी कुटुंबात जन्मलेल्या होमी यांचं पुढील शिक्षण मुंबईमध्ये झालं. 1942 साली त्या दिल्लीत आल्या.

होमी यांनी 'इलुसस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'सारख्या अनेक प्रकाशनांसाठी काम केलं.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, होमी यांनी 'इलुसस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'सारख्या अनेक प्रकाशनांसाठी काम केलं.

आपल्या कारकीर्दीत होमी 20 व्या शतकातील महनीय व्यक्तींच्या संपर्कात आल्या.

अनेकदा तर त्यांनी सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून असे फोटो मिळवले जे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मिळवता आले नाही.

अनेकदा सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून होमी यांनी फोटो मिळवले.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, अनेकदा सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून होमी यांनी फोटो मिळवले.

अनेकदा सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून होमी यांनी फोटो मिळवले. यामुळेच कदाचित होमी यांच्यावर समीक्षकांनी टीका केली असावी.

होमी यांचं कार्य हे अतिशयोक्ती दर्शवणारं होतं. तसंच नवीन राष्ट्रांच्या वचनांसंबंधी भ्रमनिरास करणारंही होतं. असं त्यांच्या समीक्षकांचं मत आहे.

1939 ते 1970 दरम्यान भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार होमी त्यांच्या टॅलेंटमुळंच पुरुषी वर्चस्व असलेल्या या व्यवसायातील अनेक अडथळे दूर करू शकल्या.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, 1939 ते 1970 दरम्यान भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार म्हणून होमी त्यांच्या टॅलेंटमुळंच पुरुषी वर्चस्व असलेल्या या व्यवसायातील अनेक अडथळे दूर करू शकल्या.

उत्कृष्ट छायाचित्रांमधून आपल्या व्यवसायाला न्याय देणाऱ्या छायाचित्रकार म्हणून होमी व्यारावाला यांची ओळख आहे.

चार दशकांपासून होमी यांना त्यांच्या छायाचित्रांसाठी ओळखलं जात आहे.

फोटो स्रोत, Homi Vyarawalla Archive

फोटो कॅप्शन, चार दशकांपासून होमी यांना त्यांच्या छायाचित्रांसाठी ओळखलं जात आहे.

15 जानेवारी 2012 रोजी बडोदा येथे राहत्या घरी होमी यांचं निधन झालं. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त गूगलने 'फर्स्ट लेडी ऑफ द लेन्स' असं म्हणत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

(सर्व छायाचित्र सौजन्य होमी व्यारावाला आर्काईव्ह/ अल्काझी कलेक्शन ऑफ फोटोग्राफी)

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)