'पॅकेज फक्त आकड्यांचा खेळ, कर्जमाफी का नाही केली?', विरोधी पक्षांचा सरकारला प्रश्न
'पॅकेज फक्त आकड्यांचा खेळ, कर्जमाफी का नाही केली?', विरोधी पक्षांचा सरकारला प्रश्न
फक्त पॅकेजचा आकडा मोठा दाखवलाय, हा आकड्यांचा खेळ करण्यासारखं आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, त्यानंतर पाटील यांनी सवाल उपस्थित केला की कर्जमाफीची घोषणा करण्याची ही योग्य वेळ नव्हती का?
हीच जर निवडणूक विधानसभेची असती, तर नक्कीच कर्जमाफी झाली असती, असंही ते म्हणाले.
मुलाखत - दीपाली जगताप
कॅमेरा - शाहीद शेख
एडिट - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






