'चमार स्टुडिओ' या भारतीय ब्रँडची जगात का होतेय चर्चा?

व्हीडिओ कॅप्शन, 'चमार स्टुडिओ' या भारतीय ब्रँडची जगात का होतेय चर्चा?
'चमार स्टुडिओ' या भारतीय ब्रँडची जगात का होतेय चर्चा?

मुंबईतले सुधीर राजभर चमार स्टूडिओच्या माध्यमातून सामाजिक बदलासाठी प्रयत्न करत आहेत. चमार या शब्दाला केवळ जातीपूरतेच मर्यादित न ठेवता, त्याचा जगप्रसिद्ध ब्रँड त्यांनी बनवला आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या 'डिझाईन मायामी' या शोमध्ये त्यांनी भाग घेतला.

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना यांनी चमार स्टूडिओच्या चेअरमध्ये बसून फोटो शुट केलं. तर काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनीही या स्टूडिओला भेट दिली होती.

सुधीर यांना भविष्यात एक अशी शाळा बनवायची आहे जिथे लोक त्यांच्या कलांना वाव देऊ शकतील.

  • रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे

संबंधित विषय