जयंती काळे : वयाच्या 80 व्या वर्षीही पोहोणाऱ्या आजी
जयंती काळे : वयाच्या 80 व्या वर्षीही पोहोणाऱ्या आजी
नाशिकमधील 80 वर्षाच्या जयंती काळे या वीर सावरकर जलतरण तलावात दररोज पोहण्यासाठी येतात. अंगावर साडी, डोक्यावर पदर ही त्यांची ओळख. जयंती यांना अगदी लहानपणापासूनच पोहायची आवड लागली. मात्र त्यांच्या पोहोण्याला त्यांच्या घरचा विरोध होता. त्यांचं पोहायचं वेड काही केल्या कमी होत नाही म्हणून घरच्यांनी लग्न लावून दिलं, जयंती सांगतात.
मात्र लग्नानंतरही त्यांचं पोहोण्याचं वेड काही केल्या कमी झालं नाही. कालवा, विहीर, पाट, नदी, खाडी, तलाव अशा सर्वच ठिकाणी त्यांनी पोहोण्याचा आनंद घेतला आहे.
केवळ हौशेसाठी पोहोणेच नाही तर त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्येही १०० पेक्षा जास्त मेडल्स पटकावली आहेत. त्यांना पाहून इतर महिलाही दररोज स्विमिंगला येतात. या स्विमिंगमुळेच माझी तब्येत या वयातही अगदी ठणठणीत असल्याचं त्या सांगतात.
रिपोर्ट, शूट आणि एडिट - राहुल रणसुभे






