भूकंपामुळे पत्त्यासारख्या कोसळल्या इमारती, म्यानमार, थायलंडमध्ये 694 जणांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, थायलंड आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, पाहा थरारक दृश्य
भूकंपामुळे पत्त्यासारख्या कोसळल्या इमारती, म्यानमार, थायलंडमध्ये 694 जणांचा मृत्यू

म्यानमार आणि थायलंड या देशांत शुक्रवारी (28 मार्च) भूकंपाचे तीव्र धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी जास्त होती. आतापर्यंत या भूकंपात 694 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1600 हून अधिक लोक जखमी आहेत.

एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड सेंटर फॉर जिओसायन्स भूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी भूकंपाचा केंद्र म्यानमारमध्ये असल्याचं सांगितलं आहे.

थायलंडच्या राजधानीत, बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेने जाणवले.

काय घडलं? पाहुयात या व्हिडिओमध्ये

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.