पृथ्वीच्या पोटात काय दडलंय? आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो का?

पृथ्वी

फोटो स्रोत, प्रातिनिधिक फोटो

सुमारे 160 वर्षांपूर्वी एक प्रसिद्ध जर्मन भूगोल प्राध्यापक ओट्टो लिडेनब्रॅक यांनी 16 व्या शतकातील एका व्यक्तीचं हस्तलिखित शोधून काढलं. हे जगभर प्रसिद्ध झालं.

हे हस्तलिखित त्यांनी आणि त्यांच्या जावयाने, अ‍ॅक्सेलने मिळून भाषांतरित केलं. या हस्तलिखितात पृथ्वीच्या गाभ्याकडे जाणार्‍या काही गुहांच्या गुप्त प्रवेशांचा उल्लेख होता.

हे प्राध्यापक आणि त्यांचा पुतण्या कुतूहल म्हणून आइसलँडला गेले. तिथे त्यांनी आपल्यासोबत आदिवासी असलेला हंस बिल्के गाईड म्हणून सोबत घेतला. आता त्यांचा पृथ्वीच्या पोटात काय दडलंय हे शोधून काढायचा प्रवास सुरू झाला.

हे तिघेही विझलेल्या ज्वालामुखीच्या प्रदेशात गेले. सूर्याची किरणं पोहचू न शकणाऱ्या महासागरात उतरले. तिथे त्यांना सापडले चमकणारे खडक, प्राचीन जंगले आणि आश्चर्यकारक सागरी जीवन.

या ठिकाणी मनुष्याच्या उत्पत्तीचे रहस्य होतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

विज्ञानाच्या गोष्टी आवडणाऱ्या लोकांना ही कथा कशाबद्दल आहे हे आता समजलं असेल.

फ्रेंच लेखक ज्युल्स व्हर्नच्या कल्पनेतून कागदावर उतरलेल्या 'जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ' या कादंबरीतील ही कथा आहे. यात त्यांनी भूगर्भात काय दडलंय याबद्दलच्या प्रचलित सिद्धांतांचा वापर करून कादंबरी लिहिली.

पण कथा सोडली तर, पृथ्वीच्या 6,371 किलोमीटर खोलीवर काय दडलं असेल?

हे जाणून घेण्यासाठी आपणही पृथ्वीच्या पोटात जाऊ.

पृथ्वीच्या कवचात काय आहे?

आपलं जग कांद्याच्या पापुद्र्यासारख्या थरांनी बनलंय. उपलब्ध माहितीनुसार, केवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावरच जीवन आहे. म्हणजेच पृथ्वीच्या कवचाच्या पहिल्या थरावर.

काही प्राणी खोलवर खड्डे खणतात. यात उंदरांसारखे प्राणी आहेत. यातील सर्वांत खोल खड्डे नाईल मगरींनी खोदले आहे. हे 12 मीटर पर्यंत खोल आहेत.

पृथ्वीच्या या कवचावर तुर्कीमधील एलेंगुपू हे प्राचीन भूमिगत शहर आहे. ते इसवी सन पूर्व 370 मध्ये बांधलं असावं असा अंदाज आहे. त्याला डेरिंगयु असं म्हटलं जातं. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 85 मीटरपेक्षा जास्त खोल आहे.

यात 18 स्तरांचे बोगदे आहेत आणि 20,000 लोक राहू शकतील इतका हा भूमिगत बोगदा मोठा आहे.

हे शहर हजारो वर्षे वापरात होतं.

प्रातिनिधिक फोटो

जगातील सर्वात खोल बोगदे सुमारे 4 किमी खोलीपर्यंत आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांना जमिनीखाली 2 किमी अंतरावर अळ्या सापडल्या आहेत. पण 3 किमीपेक्षा जास्त खोलवर कोणतीही प्रजाती सापडत नाही.

याहीपेक्षा खोल आहे ती रशियामधील कोला विहीर.

काही जण त्याला 'गेटवे टू हेल' म्हणतात. त्यातून अत्याचारित आत्म्यांच्या किंकाळ्या ऐकू आल्याचा दावा स्थानिक करतात.

पृथ्वीच्या पोटातला 'तेजस्वी समुद्र'

भूगर्भात 30 किमी ते 50 किमी खोलीवर आपण पृथ्वीच्या पुढील थरापर्यंत पोहोचतो. ज्याला प्रावरण म्हणतात. हा भाग पृथ्वीचा पृष्ठभाग (कवच) आणि केंद्रस्थान यांच्या मधला भाग आहे.

हा पृथ्वीच्या आवरणातील सर्वात मोठा थर असून हा थर पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 82% आणि वस्तुमानाच्या 65% इतका आहे.

हा थर उष्ण खडकांचा बनलेला आहे. आपल्याला हे घन दगडांसारखे दिसत असले तरी ते प्रत्यक्षात अतिशय संथ गतीने वाहत असतात. ते वर्षातून फक्त काही सेंटीमीटरच हलतात.

प्रावरणात सुरू असलेले हे सूक्ष्म बदल भूकंप निर्मितीसाठी कारणीभूत ठरू शकतात.

पृथ्वीच्या पोटात एक मोठा चकाकणारा महासागर आहे. ज्यात पृथ्वीवरील सर्व महासागरांच पाणी मावू शकतं. मात्र, त्यात द्रवाचा एक थेंबही नसतो.

हा ऑलिव्हिन नावाच्या खनिजामध्ये अडकलेल्या पाण्याने बनलेला आहे.

जसं जसं खोलवर जाल तसं तसं तो निळ्या रंगाच्या क्रिस्टल्समध्ये बदलतो.

पृथ्वी

जसं जसं आपण पृथ्वीच्या खोलात जातो तसं तसं वाढत्या दाबामुळे अणूंचं विघटन होतं.

येथील हिरव्या रंगाचे स्फटिक निळ्या आणि तपकिरी रंगात बदलतात आणि स्फटिकांच्या कॅलिडोस्कोपसारखे दिसतात. ते सतत फिरत असतात. येथील खडक प्लास्टिकसारखे हलके आहेत. येथील खनिजे इतकी दुर्मिळ आहेत की ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळत नाहीत.

या भागात ब्रिजमॅनाइट आणि डेव्हमाओइट ही खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यांना पृथ्वीच्या प्रावरणातील उच्च दाबाची आवश्यकता असते. जर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणले तर त्यांचं विघटन होईल.

गुलाबी रंगाचे आकार

जर आपण पृथ्वीच्या आणखीन खोलवर म्हणजेच 2,900 किमी खोलीवर गेलो तर आपण आवरणाच्या तळाशी पोहोचतो.

माउंट एव्हरेस्टच्या उंचीचा पर्वत पृथ्वीच्या पोटात देखील आहे.

ती प्रचंड मोठी संरचना आहे. ते हजारो किलोमीटर रुंद आहेत. त्यांनी पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या 6 टक्के भूभाग व्यापला आहे.

त्यांना 'लार्ज लो शीअर रेट प्रोव्हिन्स' म्हणतात. त्यांना स्वतःची वेगळी नावं देखील आहेत.

आफ्रिकेत त्याला 'तुसो' म्हणतात, प्रशांत महासागराच्या भागात त्यांना 'जेसन' म्हणतात.

पृथ्वी

त्यांच्या उंचीचे अंदाज वेगवेगळे आहेत. पण तुसोची उंची 800 किमी आहे. असं म्हटलं जातं की, ही उंची माउंट एव्हरेस्टच्या उंचीइतकी आहे.

जेसनची उंची 1,800 किमी आहे. असं मानलं जातं की असे एकूण 203 एव्हरेस्ट आहेत.

परंतु ते किती मोठे आहेत या व्यतिरिक्त, त्यांची निर्मिती कशी झाली आणि त्यांचा आपल्या ग्रहावर कसा परिणाम होतो याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही.

पण त्यांच्याबद्दल ज्ञात असलेली एक गोष्ट म्हणजे हे पृथ्वीच्या बाह्य गाभ्याला लागून आहेत.

पृथ्वीच्या पोटात काय आहे?

ज्युल्स व्हर्नच्या कादंबरीतले प्रोफेसर लिडेनब्रॉक पृथ्वीच्या पोटातील संपूर्ण जग शोधून काढतात. प्राचीन प्राणी आणि भूमिगत समुद्र पाहतात.

कथेतील डायनासोर अतिशयोक्ती असेल पण कथेत भूगर्भात द्रव धातूचा समुद्र असल्याचं जे वर्णन आहे ते अगदी खरं आहे.

त्या हालचालीमुळे एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. याशिवाय पृथ्वीवरील जीवन शक्य होणार नाही.

हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीला सौर विकिरणांपासून वाचवतं. तसेच वातावरणाचा नाश करणाऱ्या अणूंच्या प्रवाहापासून संरक्षण करतं.

तिथून पुढे गेल्यावर, आपण पृथ्वीच्या सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक असलेल्या तिच्या आंतरिक गाभ्याकडे येतो.

तिचा गाभा घन लोखंड आणि निकेलचा दाट गोळा आहे. तो सूर्यासारखा गरम आहे आणि चंद्रापेक्षा थोडा लहान आहे.

पृथ्वी

फोटो स्रोत, Getty Images

यावर तीव्र दाब आहे. यामुळे धातूंचे स्फटिक बनते आणि आपल्या ग्रहाच्या मध्यभागी एक घन गोल तयार होतो.

ही अशी जागा आहे जिथे आपण कधीही जाऊ शकत नाही.

या भागाचं तापमान 6,000 °C इतकं आहे. तिथे असलेला दाब आपल्या वातावरणाच्या 3.5 दशलक्ष पट आहे. या स्थिती पाहण्यासाठी आपल्याकडे कोणतेही तपासणी साधन नाही.

द्रव धातूच्या समुद्रात बुडवलेला धातूचा गोळा आपल्यासाठी एक कोडं आहे.

पण शास्त्रज्ञ पृथ्वीच्या पृष्ठभागावरून त्याचा अभ्यास करतात. कधीकधी असं वाटतं की आपल्याला त्याबद्दल सर्व काही माहिती आहे. पण अजूनही आपल्याला ते पूर्णपणे जाणून घेता आलेलं नाही.

त्यामुळे विज्ञान आणि कल्पनाशक्तीला सीमा नसते असं जे म्हणतात ते खरंच आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)