'मी असं कधीच म्हणालो नव्हतो'; नोबेल पुरस्कार घोषणेनंतर पहिली प्रतिक्रिया देताना ट्रम्प काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, नोबेलच्या घोषणेनंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
'मी असं कधीच म्हणालो नव्हतो'; नोबेल पुरस्कार घोषणेनंतर पहिली प्रतिक्रिया देताना ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक प्रसंगी म्हणाले होते की, त्यांनी जगातील अनेक भागातील लष्करी संघर्ष थांबवत शांतता निर्माण केली आहे.

अलीकडेच गाझामध्ये हमास आणि इस्रायलमध्ये पहिल्या टप्प्यातील शस्त्रसंधीदेखील त्यांनी जाहीर केली आहे.

आता एका बाजूला नोबेल विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला आहे तर दुसऱ्या बाजूला "मी असं कधीच म्हणालो नव्हतो की हा पुरस्कार मला द्या," असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)