'तो सतत म्हणायचा, आरक्षण गेलं तर लेकरांचं शिक्षण कसं होणार?'; भरत कराडच्या आईनं काय सांगितलं?

व्हीडिओ कॅप्शन, ‘तो सतत म्हणायचा, आरक्षण गेलं तर लेकरांचं शिक्षण कसं होणार?’, भरत कराडच्या आईने काय सांगितलं?
'तो सतत म्हणायचा, आरक्षण गेलं तर लेकरांचं शिक्षण कसं होणार?'; भरत कराडच्या आईनं काय सांगितलं?

लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील 35 वर्षीय भरत कराड या रिक्षाचालक तरुणाने 10 सप्टेंबरला मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली.

कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या सुसाईट नोटमध्ये भरत कराड यांनी लिहिलं, "ओबीसी आरक्षण संपल्यामुळे हे पाऊल उचलतोय." पोलिसांनीही तक्रार नोंद करताना याचा उल्लेख केला आहे.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980