गावांमध्ये दारूबंदी झाल्यानंतरही दारूची दुकानं कशी सुरू होतात? ग्राऊंड रिपोर्टमधून आलं समोर

व्हीडिओ कॅप्शन, गावांमध्ये दारूबंदी झाल्यानंतरही दारूची दुकानं कशी सुरू होतात? पाहा बीबीसी मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
गावांमध्ये दारूबंदी झाल्यानंतरही दारूची दुकानं कशी सुरू होतात? ग्राऊंड रिपोर्टमधून आलं समोर

भारतातल्या गावांमध्ये दारुचं व्यसन हा कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात दारुबंदीचा कायद्याकडे दिलासा म्हणून पाहिलं जायचं.

नवऱ्याच्या, मुलाच्या व्यसनाने पिचलेल्या घरातल्यांना या दारुबंदीमुळे आश्वासक वाटत होतं. पण आता दारुबंदी यशस्वी झाली तरी ती टिकवून ठेवणं याचं आव्हान गावकऱ्यांसमोर आहे. कायद्यात सुधारणा करण्याची त्यांची मागणी आहे.

महाराष्ट्र सरकारने 1949 पासून दारूबंदीचा कायदा अंमलात आणला. जनता व्यसनमुक्तीच्या बाजूने उभी राहील तिथे शासन बंदीच्या बाजूने उभे राहील असं शासनाचं व्यसनमुक्ती धोरण सांगतं.

2007 मध्ये या प्रक्रियेनंतर जाहीर मतदान करण्याची प्रक्रिया होत होती. मात्र 2008 मध्ये यात बदल करत गुप्त मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र या मतदानातील 50 टक्क्यांपेक्षा 1 मतं जास्त पडण्याची तरतूद अडचणीची गावकऱ्यांना अडचणीची ठरतेय.

रिपोर्ट- प्राची कुलकर्णी

शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर