15 ऑगस्ट - 26 जानेवारीला कोल्हापूरमध्ये जिलबी का खातात?

व्हीडिओ कॅप्शन, 15 ऑगस्ट - 26 जानेवारीला कोल्हापुरात जिलबी का खातात?
15 ऑगस्ट - 26 जानेवारीला कोल्हापूरमध्ये जिलबी का खातात?

कोल्हापूर आणि खवय्येगिरीचं नातं वेगळं सांगायला नकोच. स्वातंत्र्यदिन म्हटला की कोल्हापुरात जिलबीसाठी रांगा लागतात.

शहरातल्या एका प्रसिद्ध हॉटेलवर पूर्वी तालमीतले मल्ल जिलबीचा नाश्त्या करायला यायचे.

असे करत करत जिलबीचे स्टॉल वाढू लागले आणि 15 ऑगस्ट – 26 जानेवारीला जिलबी खाण्याची प्रथा रूढ झाली.

सकाळी लवकर लोक जिलबी घेण्यासाठी गर्दी करतात.

हळूहळू जिलब्यांमध्ये वेगवेगळे फ्लेवर्सही यायला लागले.