मराठी भाषेवरून लोकल ट्रेनमध्ये वाद? अर्णव खैरे सोबत नेमकं काय घडलं?
19 व्या वर्षांच्या अर्णव खैरेचे कुटुंबिय धक्क्यातून सावरलेले नाहीत. ‘मराठी–हिंदी’ वादातून मारहाण झाल्यावर आपल्या मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
अर्णव मुलुंडच्या केळकर कॉलेजात विज्ञान शाखेत शिकायचा. 18 नोव्हेंबरला नेहमीसारखं ट्रेनने कॉलेजला जात असताना त्याला मारहाण झाल्याचं वडील सांगतात.
-: महत्त्वाची सूचना :-
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






