अंतराळातून भारत भव्य का दिसतो? नकाशावरचे देश प्रत्यक्षात तेवढेच असतात का?

व्हीडिओ कॅप्शन, अंतराळातून भारत भव्य का दिसतो? नकाशावरचे देश प्रत्यक्षात तेवढेच असतात का? सोपी गोष्ट
अंतराळातून भारत भव्य का दिसतो? नकाशावरचे देश प्रत्यक्षात तेवढेच असतात का?

मर्केटर प्रोजेक्शन ही नकाशा तयार करायची एक पद्धत आहे. या प्रकारच्या नकाशामुळे नाविकांना सरळ रेषा आखून अक्षवृत्त - रेखावृत्त ओलांडून जाणारा मार्ग आखता येऊ लागला.

अजूनही समुद्री आणि हवाई नेव्हिगेशनसाठी ही मर्केटर प्रोजेक्शनची पद्धत वापरली जाते. पण यामुळे काय होतं, तर नकाशावरची भूभागांची क्षेत्रफळं चुकीची दिसतात.

नकाशावर दिसणारा देशांचा आकार त्यांच्या प्रत्यक्षातल्या आकारापेक्षा वेगळा आहे. असं का होतं? मर्केटर प्रोजेक्शन काय आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : शरद बढे