पी. के. रोझी : मल्याळम चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला दलित अभिनेत्री

व्हीडिओ कॅप्शन, पी. के. रोझी : पहिली दलित हिरोईन, जिला स्वत:चाच सिनेमा पाहता आला नाही
पी. के. रोझी : मल्याळम चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला दलित अभिनेत्री

पी. के. रोझी या मल्याळम चित्रपटासृष्टीतील पहिल्या नायिका होत्या. दलित पुलया कुटुंबात जन्मलेल्या रोझींनी जे. सी. डॅनियल यांच्या 'विगथकुमारन' या चित्रपटात मुख्य अभिनेत्री उच्चवर्णीय महिलेची भूमिका साकारली होती. पुढे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, उच्चवर्णीय लोकांच्या संतापाचा त्या केंद्रबिंदू ठरल्या.

पुढे अशांतता निर्माण झाली आणि पी.के. रोझींनी आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला आणि उच्चवर्णीय पुरुषाशी लग्न केलं. त्या पहिल्या चित्रपटाची कोणतीही प्रत आता अस्तित्वात नाही.

त्यांचीच कहाणी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

कविता: अलीना

रिपोर्ट: बिमल थंकचन आणि दिव्या उप्पल

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)