पोर्तुगीजांना नमवत मराठा सैन्याने जिंकलेल्या वसईच्या किल्ल्याची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, पोर्तुगीजांना नमवत मराठा सैन्याने जिंकलेल्या वसईच्या किल्ल्याची गोष्ट
पोर्तुगीजांना नमवत मराठा सैन्याने जिंकलेल्या वसईच्या किल्ल्याची गोष्ट

सुमारे 450-500 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक युरोपीय पद्धतीचं शहर होतं. तिथं अधिकारी-सैनिकांची घरं होती, चर्चेस होती, हॉस्पिटल, बाजारपेठ, न्यायालय, नगरपालिका, कॉलेजेस, विहीरी, बांधलेले रस्ते, हॉटेल्स, सांडपाण्याची व्यवस्था होती असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का?

पण हे खरंच महाराष्ट्रात मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर एक शहर होतं. अनेक उंचच इमारती आणि वर्दळीनं भरलेलं हे शहर थेट वसईच्या किल्ल्यातच होतं.

वसईचा किल्ला हा व्यापाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी भारतात किती बळकटपणे पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उखडून टाकण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याचं उदाहरण म्हणावं लागेल. वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच त्याहून वसईची मोहीम, वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)