माणसाच्या थेट डोळ्यात दात आला, हे दुर्मिळ प्रकरण नेमकं काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, अतिशय दुर्मिळ केस, या माणसाच्या डोळ्यात उगवला दात
माणसाच्या थेट डोळ्यात दात आला, हे दुर्मिळ प्रकरण नेमकं काय आहे?

वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनव्या घटना घडताना दिसतात. अनेकदा रुग्ण एखाद्या आजारावर उपचारासाठी जातो. मात्र, जेव्हा उपचार सुरू होतात, तेव्हा त्याला वेगळाच आजार असल्याचं समोर येतं.

पाटणा येथील इंदिरा गांधी मेडिकल सायन्सेस (आयजीआयएमएस) रुग्णालयात नुकतंच असंच एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे.

या रूग्णालयात आलेल्या एका रुग्णाच्या उजव्या डोळ्यात दात निघाला. या रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, हा प्रकार वैद्यकीय शास्त्रातील अत्यंत दुर्मिळ प्रकारांपैकी एक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)