इडली भारतात नेमकी कुठून आली? हा मूळ भारतीय पदार्थ नाहीये?

- Author, सौम्या अलमुरू
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
सकाळच्या न्याहरीचा आवडता बेत म्हणजे इडली.
उपमा, पोहे, छोलेभटोरे, पुरी भाजी हे सगळं छानच लागतं. पण इडलीची बातच न्यारी.
प्रसन्न सकाळी हलक्या, सच्छिद्र लुसलुशीत इडल्या, वाफाळतं सांबार आणि ताज्या नारळाची खोवलेली चटणी हे खाऊन कोणाला छान वाटणार नाही?
तेल नसल्याने इडली खाल्यावर तेलकट खाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

इडली पात्रामुळे एका वेळी 12-16 इडल्या तयार होतात. इडली पचायलाही चांगली असते.
दक्षिण भारतात तुम्ही कुठेही गेलात तरी इडली तुमची साथ देते. तेलुगू प्रांतात तसंच कर्नाटक आणि केरळमध्ये इडल्या उडीद आणि तांदळासह होतात.
इडली राईसला डोड्डू राईस असंही म्हटलं जातं.
दक्षिण भारताची ओळख असलेल्या इडलीने भारतभरातल्या लोकांना आपलंसं केलं आहे. पण इडली आपली नाही असं सांगितलं तर?
इतिहासकार याचं उत्तर 'हो' असं देतात.
इडलीचं कूळ

खाद्य इतिहासकार केटी अचिंया या इडलीचं कूळ सांगतात. कर्नाटक भागात आढळलेल्या कवितांमध्ये इडलीचा उल्लेख सापडतो. इडलिगा आणि इडरिका असं संस्कृतात त्यांना म्हटलं गेलं आहे.
‘अलिगे’ म्हणजे कन्नड भाषेत वाफेचे भांडं. इडलिगे शब्द त्यातूनच निर्माण झाला असावा, असं अचिंया यांना वाटतं.
अचिंया यांनी 'इंडियन फूड-अ हिस्टॉरिकल कम्पॅनियन' या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे इसवीसनपूर्व 920 मध्ये इडलीचा पहिल्यांदा उल्लेख कन्नड कवी शिवाकोटी यांच्या कवितेत आढळतो. वदारंदे नावाची ही कविता होती.
दारी आलेल्या पांथस्थांची भूक भागवण्यासाठी 18 विविध घटकांपैकी इडली एक आहे, असं त्या कवितेत म्हटलं आहे. त्यानंतर साहित्यात अनेक ठिकाणी इडलीचा उल्लेख येतो.
इसवीसन 1025 मध्ये चवूंदराया यांनी इडली तयार करण्याची प्रक्रिया सांगितली. मिनीआपू, ताक, हिंग, हिंग यांचं मिश्रण करुन पेस्ट तयार केली जाते.
इसवीसन 1130 मध्ये 'मानसोलासा' नावाच्या संस्कृत पुस्तकात इडलीचा उल्लेख आहे.
मानसोलसा ग्रंथ 'अभिलाषहितार्थ चिंतामणी' या नावानेही ओळखला जातो. चालुक्य राजा सोमस्वरा 3 यांनी तो लिहिला होता.
या ग्रंथात इडली तयार करण्याच्या प्रक्रियेचं सम्यक वर्णन आहे. उडीद डाळीचे उंडे किंवा गोळे करून त्याच्यावर मिरं, जिरे आणि हिंग यांची फोडणी दिली जाते. त्यानंतर तुपात तळले जातील.

फोटो स्रोत, Getty Images
गोलाकार आकाराच्या पांढऱ्याशुभ्र रवाळ इडल्या असं त्यांचं वर्णन करण्यात आलं आहे. इसवीसन 1235 मध्ये इडलींचा उल्लेख हलक्या, सच्छिद्र असा करण्यात आला होता.
तामिळनाडूत 17व्या शतकात 'मच्छपूर्णम' मध्ये इटली असं इडलीचं वर्णन आहे.
मात्र या तिन्ही उल्लेखांमध्ये तांदळाचा वापर करुन इडली केली आहे असं म्हटलेलं नाही. अचिंया यांच्या मते इडली उडीदपासूनच बनवण्यात आली असावी.
इडली तयार करण्याच्या आधुनिक प्रकारांचा कुठेही उल्लेख नाहीये. तांदूळ, उडीद डाळ यांचं मिश्रण तयार करणं, ते वाटून घेणं, किण्वन प्रक्रिया याबाबत उल्लेख नाही. त्यानंतर इडली वाफवल्या जातात.
इडली तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत तसंच ती कुठून आली याबाबत पुस्तकात उल्लेख नाही.
1485 इसवीसनपूर्व आणि 1600 या कालावधीत इडलीची तुलना चंद्राशी केली जात असे. त्यानंतर इडलीसाठी तांदळाचा वापर करण्यात येऊ लागला असावा.
इडली आली कुठून?
भारतात इडली इंडोनेशियात आली असावी, असं अचिंया यांनी पुस्तकात म्हटलं आहे. प्राचीन काळापासून इंडोनेशियात पदार्थ वाफवून तयार केले जात असत. सोयाबीन, शेंगदाणे, मासा हे वाफवून खात असत.
इंडोनेशियातला केडली नावाचा पदार्थ आंबवून आणि वाफवून केला जात असल्याची नोंद अचिंया यांनी केली आहे.
चीनमध्येही प्राचीन काळापासून वाफवण्याची प्रक्रिया केली जात असे. ह्युआन त्सांग हा चीनचा बुद्ध भिख्खू सातव्या शतकात भारतात आला होता. त्यावेळी भारतात पदार्थ वाफवण्याचं भांडं नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
अचिंया यांच्या मते इंडोनेशियावर राज्य करणाऱ्या हिंदू राजांसाठी स्वयंपाक करणारे बल्लवाचार्यांनी भारतात फर्मेंटेशनची प्रक्रिया आणली असावी.
डाळींबरोबरच तांदळाचा वापर मिश्रण तयार करण्यासाठी झाला तर इडली आणखी चविष्ट आणि रुचकर होते, असं लक्षात आल्यानंतर मग पुढे त्यात तांदळाचा वापर सुरू झाला.
केडलीसारखा पदार्थ चेकोस्लोव्हाकियात तयार केला जात असे. नीडलक असं त्याचं नाव होतं.
इडलीव्यतिरिक्त कडबू अशा नावाचाही पदार्थ असे. कन्नड काव्यात याचा उल्लेख सापडतो. इसवीसनपूर्व 1430 याचा उल्लेख असल्याचं अचिंया सांगतात. कडबू पानांमध्ये गुंडाळलेलं असे आणि शिजवलेलं असे. त्याला आम्ही 'कुडू' म्हणत असू.

त्यांना इडली कशी करायची माहिती नसलं तरी पदार्थ वाफवायचे कसे हे ठाऊक होतं. ह्युआन त्सांगने भारतात पदार्थ वाफवण्यासाठीची पात्रं नव्हतं असं म्हटलं. पण त्याचा अर्थ पदार्थ वाफवून करता येण्याचं तंत्र माहिती नव्हतं असं नव्हे.
भारतीयांना सोप्या पद्धतीने वाफवण्याचं तंत्र माहिती होतं.
पाणी उकळून, सामुग्री जाडसर कापड्यात बांधली जात असे. बांबूच्या परडीत ते ठेवलं जातं. केरळमध्ये पुट्टू करण्यासाठी सगळी सामुग्री बांबूच्या परडीत ठेऊन खाली उकळतं पाणी ठेवलं जातं.
सिंधू संस्कृतीत जुनं भांडं सापडलं. पदार्थ वाफवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे असं केटी अचिंया यांनी सांगितलं.
इडलीचे किती प्रकार असतात?
इंडोनेशियातून भारतात आलेल्या इडलीमध्ये कालौघात अनेक बदल झाले आहेत. इडलीवर अनेक प्रयोगही झाले. एमटीआर इडली आणि कांचीपुरम इडली आता चांगलेच लोकप्रिय आहेत.
इडली हा केवळ भारतभरातला नव्हे तर जगातला महत्त्वाचा पदार्थ आहे ,असं खाद्यसमीक्षक वीर संघवी म्हणतात.
रवा इडली, रागी इडली, पोडी इडली, थट्टे इडली, बटन इडली, स्टफ इडली, शेजवान इडली अशी इडली नव्या रुपांमध्ये मिळू लागली.
अलीकडेच काळ्या रंगाची इडलीही प्रसिद्ध झाली आहे. चारकोलपासून तयार केलेली इडली ब्लॅक इडली म्हणून ओळखली जाते. पांढऱ्याशुभ्र इडलीला हा काळा रंग बघून सोशल मीडियावर अनेकांनी जोरदार टीकाही केली आहे.
2020 मध्ये डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीने भारताचं पहिलंवहिलं अवकाशयान गंगायानमधील अंतराळवीरांसाठी काही पदार्थ तयार केल्याचं सांगितलं होतं.
त्यापैकी एक पदार्थ इडली सांबार होता. इडली सांबार पॅक करून अंतराळवीरांना देण्यात आलं होतं.
कोव्हिडच्या संसर्गामुळे गंगायान अवकाशयानाचं प्रयाण लांबणीवर गेलं. 2024 मध्ये हे यान अवकाशात झेपावू शकतं. याचाच अर्थ दोन तीन वर्षात इडली अंतराळातही जाऊ शकते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








