दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर परिणाम होणार?

व्हीडिओ कॅप्शन, दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर परिणाम होणार?
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर परिणाम होणार?

दाना चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून त्याचं आता तीव्र चक्रीवादळात म्हणजे 'सिव्हियर सायक्लॉन स्टॉर्म'मध्ये रूपांतर झालं आहे.

गुरुवारी मध्यरात्री ओडिशातील पुरी आणि बंगालच्या किनाऱ्यालगत सागर बेट यांदरम्यानच्या भागात हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)