'सावकारांचे कर्ज अन् रस्त्याचे खड्डे बुजतच नाही', संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याला एवढे का कंटाळले लोक?
'सावकारांचे कर्ज अन् रस्त्याचे खड्डे बुजतच नाही', संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याला एवढे का कंटाळले लोक?
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झालीय.
जिथं लोकांना दीड तास लागायचा, तिथं आता 4 तास लागत आहे. शिवाय खड्ड्यांमुळे अपघातही होत असल्याचं स्थानिक आणि प्रवासी सांगत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे.
त्यामुळे एका बाजूची वाहतूक थांबवण्यात येते आणि एकाच बाजूने वाहनांना घाट चढावा लागतो. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. या रस्त्याच्या दुरावस्थेबाबतचा बीबीसी मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – नीलेश भोसले
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






