अदानी समूहाच्या खाणीला नागपूर जिल्ह्यातील या गावातल्या लोकांचा विरोध का आहे?
नागपूर जिल्ह्यातील दहेगाव- गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पावर गावकऱ्यांनी आक्षेप घेत आपला विरोध तीव्र करण्याचं ठरवलं आहे.
सप्टेंबरमध्ये पर्यावरण विभागाकडून जनसुनावणी घेण्यात आली होती. वलनी गावात ही जनसुनावणी झाली होती. तेव्हाही गावकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. ही प्रस्तावित खाण अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेडची आहे.
खाणीमुळे अनेक समस्या निर्माण होतील असं ग्रामस्थांचे म्हणणे आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना कंपनीने म्हटले होते की "खाणकाम हे पूर्णपणे शून्य-द्रव उत्सर्जन प्रणालीवर आधारित आहे. निर्माण होणाऱ्या अधिकच्या पाण्यावर प्रकिया करून जवळच्या नाल्यात, तलावात सोडले जाईल जेणेकरून ते पाणी शेतकऱ्यांना वापरता येईल."
ग्रामस्थांचा या भूमिगत कोळसा खाणीला इतका विरोध का आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही या गावांमध्ये पोहोचलो.
खाण प्रस्तावित असणारा हा परिसर नागपूरपासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचा परिसर संपताच उजवीकडे वळल्यानंतर हा परिसर सुरू होतो.
आम्ही पहिल्यांदा जनसुनावणी झालेल्या वलनी गावात पोहोचलो. त्यावेळी आम्हाला गावकऱ्यांनी काय सांगितले?
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
शूट- मनोज आगलावे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






