बिहारमधली दारूबंदी खरंच किती यशस्वी झाली? ग्राऊंड रिपोर्ट
बिहारमधली दारूबंदी खरंच किती यशस्वी झाली? ग्राऊंड रिपोर्ट
2016 साली बिहारमध्ये दारूबंदी कायदा आणला गेला. 9 वर्षांपासून दारूबंदी असतानाही आजही बिहारमध्ये दारूचा अवैध व्यापार सुरूच आहे.
या निवडणुकीतही दारूबंदीची चर्चा होतेच आहे. प्रशांत किशोर यांनी या कायद्यावर आणि त्याच्या अंमलबजावणीवर टीका केलीय तर तेजस्वी यादव यांनीही यात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
बिहारमध्ये लागू झालेल्या दारूबंदी कायद्याचा खरा उद्देश साध्य झाला का? की हे फक्त एक अपूर्ण राजकीय आश्वासन ठरलं?
या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव आणि व्हिडिओ जर्नलिस्ट सेराज अली यांनी बिहारमधून केलेला हा खास ग्राउंड रिपोर्ट पाहा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



