जुन्या बँक खात्यातले पैसे, अनक्लेम्ड डिपॉझिट्स परत कसे मिळवायचे?

व्हीडिओ कॅप्शन, जुन्या बँक खात्यातले पैसे, अनक्लेम्ड डिपॉझिट्स परत कसे मिळवायचे?
जुन्या बँक खात्यातले पैसे, अनक्लेम्ड डिपॉझिट्स परत कसे मिळवायचे?

भारतामध्ये अशी लाखो खाती आहेत, ज्यांमधले पैसे ठेवीदारांनी वा त्यांच्या वारसांनी घेतलेले नाहीत.

कोणत्या ठेवींना Unclaimed Deposits म्हटलं जातं? एखादं खातं तुम्ही बराच काळ वापरलं नाहीत, तर त्यातल्या पैशांचं काय होतं? आणि ते पैसे परत कसे मिळवायचे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

अनेकदा एखादं सेव्हिंग्स किंवा करंट अकाऊंट वापरणं बंद झालं किंवा मुदत पूर्ण झालेली FD क्लेम करायची राहिली तर पैसे असेच राहतात. अनेक प्रकरणांमध्ये कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर घरच्यांना बँक खात्याबद्दल, ठेवीबद्दल माहिती नसेल तरीही असं होऊ शकतं.

बँक खातेदार, ठेवीदार स्वतः अशा दावा न केलेल्या ठेवींचे पैसे परत मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. किंवा निधन झालेल्या ठेवीदारांचे नॉमिनीज किंवा कायदेशीर वारसही ही प्रक्रिया करू शकतात.

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)