मासिक पाळीचा विषय मांडणाऱ्या 'बाई तुझ्यापायी'च्या अभिनेत्री क्षिती आणि मानसी याविषयी काय म्हणाल्या?

व्हीडिओ कॅप्शन, 'बाई तुझ्यापायी'च्या निमित्तानं अभिनेत्री क्षिती जोग आणि साजिरी जोशी पाळीविषयी सांगतात..
मासिक पाळीचा विषय मांडणाऱ्या 'बाई तुझ्यापायी'च्या अभिनेत्री क्षिती आणि मानसी याविषयी काय म्हणाल्या?

'बाई तुझ्यापायी' ही नवी वेबसीरिज मासिक पाळी आणि त्याविषयीचे समज-गैरसमज, एका मुलीची स्वप्नं, बाई म्हणून मिळणारी दुय्यम वागणूक, श्रद्धा अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करते.

या मालिकेत अभिनेत्री क्षिती जोग आणि साजिरी जोशी आई आणि मुलीची भूमिका करत आहेत.

आजच्या काळात मासिक पाळीबद्दलचा आपला संकोच किती कमी झाला आहे? आपण किती मोकळेपणाने या विषयावर बोलू शकतो? याविषयी दोघींना काय वाटतं?

हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले... त्यांचे हे अनुभव.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)