'घर मोडलं, शेत गेलं, लोकांनी दिलेलं खातोय, मग कसली दिवाळी?' मराठवाड्यातील पूरग्रस्तांची व्यथा
'घर मोडलं, शेत गेलं, लोकांनी दिलेलं खातोय, मग कसली दिवाळी?' मराठवाड्यातील पूरग्रस्तांची व्यथा
दिवाळीचा सण हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि शेतीतल्या संपन्नतेचा म्हणून ओळखला जातो. पण धाराशिव, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांत यंदा आलेल्या पुरानं सगळं उध्वस्त केलं. त्यामुळे अनेकांची दिवाळीही अंधारातच गेली. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील लाखी इथे तर अख्या गावाने दिवाळी साजरी केली नाही.