पुणे पोलिसांवर मुलींना जातिवाचक शिवीगाळाचे आरोप, कोर्टाने काय आदेश दिले?
ऑगस्ट महिन्यात कोथरूड पोलिसांनी काही तरुणींना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता.
एका पीडितेला मदत करणाऱ्या तरुणांनाच पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ केला तसंच अपमानास्पद वागणूक दिली अशी तक्रार होती. या आरोपांबाबत पोलिसांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचं सांगत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करायला नकार दिला होता.
याविरोधातील याचिकेवर निकाल देत पुणे कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वकील परिक्रमा खोत यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
पुण्यामध्ये पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद व्हावा, अशी मागणी करणाऱ्या मुलींच्या लढ्याला यश आलं आहे.
न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यामध्ये पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद व्हावा, अशी मागणी करणाऱ्या मुलींनी 21 ऑगस्ट रोजी पुणे सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती.
पोलिसांवर गुन्हा नोंद व्हावा यासाठी 3 ऑगस्ट रोजी पीडित मुलींच्या बाजूने पुणे आयुक्तालय परिसरात ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आलं होतं.
मात्र, पोलिसांनी सरकारी कामात अडथळे आणल्याचा दावा करत या मुलींवरच गुन्हा नोंदवला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






