'ब्रेक फ्री स्टोरीज' या ग्रुपमधील महिलांची गोष्ट का आहे खास?
'ब्रेक फ्री स्टोरीज' या ग्रुपमधील महिलांची गोष्ट का आहे खास?
महिलांचा हा ग्रुप केरळच्या सफारीला निघाला आहे. ‘ब्रेक फ्री स्टोरीज’ नावाचा हा ग्रुप राफिया अफी यांनी तयार केला आहे.
त्या या माध्यमातून घटस्फोटित महिलांना नवी दिशा दाखवत आहेत.
राफिया यांचा एक वर्षापूर्वी घटस्फोट झाला, तेव्हा ती नैराश्यात गेली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला औषधं घ्यावी लागली. पण नंतर तिला जाणवलं की ती फक्त निसर्गाच्या जवळ राहूनच खऱ्या अर्थाने बरी होऊ शकते.
आजवर राफियाने अशी 8 शिबिरे आयोजित केली आहेत. केरळमध्ये 7 आणि दुबईमध्ये 1.
आतापर्यंत सुमारे 100 महिलांनी या शिबिरांमध्ये भाग घेतला आहे आणि अशी community तयार केली आहे, जिथे त्या मोकळेपणाने बोलू शकतात.
पाहा त्यांची कहाणी.
व्हिडिओ: सुमेधा पाल आणि अरीबा अन्सारी






