'पैशानं लेकरू माघारी येणार आहे का?' पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या आईचा टाहो
'पैशानं लेकरू माघारी येणार आहे का?' पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या आईचा टाहो
सध्या पावसानं राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात हाहाकार माजवला असल्याचं पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यालाही या पुराचा तडाखा बसला आहे.
बीडच्या पिंपळवाडी गावात राहणाऱ्या कळसाने कुटुंबीयांना या पुरानं उध्वस्त करून टाकलं. या गावाशेजारून बिंदुसरा नदी वाहते.
कळसाने कुटुंबातील मुलगा आदित्य शेतात जाताना पाय घसरून पाण्यात पडला आणि तासाभरानंतर त्याचा मृतदेहच सापडला. त्यानंतर त्याच्या आईनं टाहो फोडला आहे.
बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






