राज्यात यावर्षीचा उन्हाळा कसा असेल? हवामान विभागानं काय म्हटलं?
राज्यात यावर्षीचा उन्हाळा कसा असेल? हवामान विभागानं काय म्हटलं?
राज्यात यावर्षीचा उन्हाळा कसा असेल? याबाबत भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवले आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या सिझनल फॉरकास्टनुसार, कोकणाचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात जास्त उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. म्हणजे उष्णतेच्या लाटांचे प्रमाण जास्त असू शकते. विदर्भात तर हे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यातही पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण तीव्र असेल.






