लोणार सरोवर कसे आणि केव्हा तयार झाले? तिथे काय काय होते?
लोणार सरोवर कसे आणि केव्हा तयार झाले? तिथे काय काय होते?
लोणारचं विवर आणि सरोवर कायमच महाराष्ट्रात एक आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. लोणारवर जगभरातले शास्त्रज्ञ संशोधन करत असतात आणि कालांतराने नवनवीन रहस्यं उलगडत असतात.
उदाहरणार्थ गेल्या दशकात झालेलं संशोधन असं सांगतं की लोणारचा अशनीपात हा अंदाजे 5 लाख 70 हजार वर्षांपूर्वी झाला.
काही अभ्यासक लोणारचा अभ्यास मंगळ आणि चंद्राच्या पृष्ठभाग समजून घेण्यासाठी करत आहेत.
लोणारला UNESCO जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या सगळ्याचा हा विस्तृत आढावा.
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
शूट, एडिट - शरद बढे
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






