मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये 4 महिन्यांपासून राहतोय पाकिस्तानचा नागरिक

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानी व्यक्तीसाठी मुंबईतील पोलीस स्टेशन तात्पुरतं घर कसं झालंय?
मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये 4 महिन्यांपासून राहतोय पाकिस्तानचा नागरिक

'मला इथे लोक खान भाई बोलतात, घरातल्यांप्रमाणे वागवतात', असं मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये 4 महिन्यांपासून राहणाऱ्या 'पाकिस्तानच्या नागरिका'ने सांगितलं.

दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 65 वर्षीय नादीर करीम खान गेल्या चार महिन्यांपासून राहत आहेत. ते मूळचे पाकिस्तान, कराची इथले असल्याचं ते सांगतात.

एमआरए मार्ग पोलीस स्टेशन हेच त्यांचं तात्पुरतं घर बनलं आहे. पोलीस स्टेशनच्या आवारातच ते राहतात. जेवण, राहणं, झोपणं, सारं काही पोलीस स्टेशनच्या आवारात.

11 ऑक्टोबर 2024 रोजी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यापासून ते एमआरए पोलीस स्टेशनला राहत आहेत.

पाहा बीबीसी प्रतिनिधी दिपाली जगताप यांचा हा सविस्तर रिपोर्ट.

शूट आणि एडिट - शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)