मिरचीच्या शेतीने 'या' गावातल्या शेतकऱ्यांना कसा दिला हात?
मिरचीच्या शेतीने 'या' गावातल्या शेतकऱ्यांना कसा दिला हात?
चंद्रपूरच्या राजुरा भागात शेतकरी मिरचीच्या पिकावर समाधानी दिसतायत. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा. जिल्ह्यातील 67 टक्के लोक शेती आणि संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. यात साधारण 70 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. 35 टक्के भात या पिकाने तर 33 टक्के क्षेत्र हे कापूस या पिकाने व्यापलेलं आहे.
चंदपूर जिल्ह्यातील 68 टक्के क्षेत्र या दोन पिकाने व्यापलं असलं तरी यामधून निघणारे उत्पन्न अत्यल्प असल्याचं शेतकरी सांगतात. याला Socio-Economic Reviews 2019 ची देखील जोड आहे.
या पार्श्वभूमीवर राजुरा येथील शेतकरी कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या मदतीने मिरची लागवडीकडे वळले आहेत.
- रिपोर्ट- अविनाश पोईनकर
- शूट- हेमंत एकरे
- व्हीडिओ एडिट- निलेश भोसले






