खड्डे, अपघात, डेडलाईन्स; मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार?

व्हीडिओ कॅप्शन, खड्डे, अपघात, डेडलाईन्स… मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार?
खड्डे, अपघात, डेडलाईन्स; मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार?

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गणेशोत्सव अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या कोकणातल्या चाकरमान्यांना प्रवासाची चिंता सतावतेय.

हे खड्डे बुजवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ उपाययोजना केली असली तरी अजूनही कामं प्रलंबित आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी येत्या डिसेंबरपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय.

रिपोर्ट- अल्पेश करकरे

शूट- शार्दुल कदम

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर