महाराष्ट्राची गोष्ट : मराठा आरक्षण आणि जातीचं राजकारण; डॉ. सदानंद मोरेंना काय वाटतं?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत जात हा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. मग तो आरक्षणाच्या मागणीनिमित्त असेल किंवा जातनिहाय जनगणनेच्या मागणीनिमित्त असेल. या जातीमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि त्यांचे इतिहासातील धागेदोरे यावर बीबीसी मराठीनं डॉ. सदानंद मोरे यांच्याशी बातचित केलीय. डॉ. सदानंद मोरे हे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक, संशोधक आहेत.
मराठा आरक्षण, त्यांचे इतिहासातील संदर्भ डॉ. मोरेंनी या मुलाखतीत अधिक विस्तृतपणे सांगितले आहे.
तसंच, या सगळ्याचा पुढे होणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होणार? निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार?
बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी 'महाराष्ट्राची गोष्ट' या मालिकेअंतर्गत डॉ. सदानंद मोरे यांच्याशी संवाद साधला आणि सर्व मुद्द्यांवर सविस्तर बातचित केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






