शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक मनसेच्या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा काय घडलं?
शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक मनसेच्या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा काय घडलं?
मनसेने मीरा भाईंदरमध्ये काढलेल्या मोर्चावरून मोठा गदारोळ होताना दिसतोय. बरेच तास रखडल्यानंतर अखेर ठरलेल्या मार्गावरूनच मनसेचा मोर्चा निघाला.
सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारली गेली होती, शिवसेनेचेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यामागे कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगितलं.
पण प्रताप सरनाईक स्वतः या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथे गदारोळ झाला, घोषणाबाजी झाली.