मनसे कार्यकर्त्यांची अमराठी दुकानदाराला मारहाण, व्यापारी संघाने केली दुकानं बंद
मनसे कार्यकर्त्यांची अमराठी दुकानदाराला मारहाण, व्यापारी संघाने केली दुकानं बंद
मराठी न बोलणाऱ्या एका दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेचा व्हीडिओ रेकॉर्ड करून तो प्रसारित केल्यानंतर व्यापारी संघाने या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसात धाव घेतली.
दरम्यान, या मारहाणीचा निषेध म्हणून व्यापारी संघाने एका मोर्च्याचं 3 जुलैला एका आयोजन केलं. तसंच मीरा भाईंदर परिसरातली त्यांची दुकानं बंद ठेवली. यावेळी बोलताना संबंधित व्यापाऱ्याने आपल्याला मनसे कार्यकर्त्यांच्या मारहाणीमुळे मानसिक धक्का बसल्याचं म्हटलं आहे.






