या महिलेला आपली 'व्हर्जिनिटी गमावण्यासाठी' सेक्स वर्कर का शोधावा लागला?

मॅलानी

फोटो स्रोत, Melainie

    • Author, बेथ रोझ
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मेलानी तिच्या घरात कोव्हिडच्या काळात आयसोलेशनमध्ये होती. तिने तेव्हाच ठरवलं होतं की हे सगळं मोकळं झालं की ती एक सेक्सवर्कर आणणार. कौमार्यभंग करणार, आणि एका विकलांग व्यक्तीवर प्रेम कोण करणार या चिंतेवर कायमचा पडदा पाडणार. चेस नावाच्या एका माणसाला तिने बुक केलं.

मेलानीच्या मदतनीसाने तिला ही कल्पना दिली. त्या तेव्हा एकत्र आयसोलेशनमध्ये होत्या. ट्रेसी नावाच्या एका बाईने तिला मसाज दिला होता.

मेलानीला या आधी अशा पद्धतीने कोणीही स्पर्श केला नव्हता. तिला लक्षात आलं की, तिला हे आवडतंय आणि तिला ते आणखी हवंय.

ट्रेसी (हे तिचं खरं नाव नाही) ने सांगितलं की, ती आधी सेक्स वर्कर होती. त्यामुळे तिने पर्याय दिला की वैयक्तिक सेवा घेण्याचा विचार ती करू शकते.

“तिच्या या बोलण्याने माझे डोळे उघडले. मला असं वाटलं की मी याचा अनुभव घेऊ शकते,” मेलानीने सांगितलं.

तिने एक ऑनलाईन एस्कॉर्ट एजन्सी शोधली. तिथे चेस नावाच्या एका माणसाचा फोटो तिला दिसला.

आनंदात तिने बुकिंग केलं आणि त्या मुलाच्या अपार्टमेंटमध्ये गेली.

“मी जेव्हा माझ्या खुर्चीतून उतरले आणि माझी मदतनीस गेली तेव्हा फक्त आम्ही दोघं होतो. मी काय करणार होते याची मला कल्पना नव्हती.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मेलानी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून व्हीलचेअरवर आहे. तिला Transverse Myelitis नावाचा एक आजार आहे. त्यामुळे तिच्या पायाला पक्षाघात झाला. तिच्या हाताची हालचाल मर्यादित होती. रोजची कामं करण्यासाठी तिला मदतीची गरज लागते.

ती जपानमध्ये राहिली आहे आणि आता ती व्हीडिओ एडिटर आहे. मात्र कधी कोणावर प्रेम करावं हे तिच्या खिजगणतीत नव्हतं. 'झालं तर ठीक' असा विचार मी तेव्हा केला होता.

डेटिंग आणि इतरांशी मोकळेपणाने बोलणं अनेकदा त्रासदायक होऊ शकतं. विकलांग लोकांबरोबर सेक्स करता येतो हे फारसं कुणी लक्षात घेत नाही.

UK Disablity Survey ने 2021 मध्ये एक सर्वेक्षण प्रकाशित केलं होतं. त्यानुसार विकलांग व्यक्तीशी अशा प्रकारचं नातं किंवा रोमँटिक नातं ठेवण्यासाठी 56 टक्के लोक राजी होते.

मेलानीला स्वत: असं कसं करावं हे माहिती नव्हतं. त्यामुळे तिने ते नशीबावर सोडलं होतं.

चेसची चौकशी केल्यावर तिने त्याच्याबरोबर अनेक व्हीडिओ कॉल केले. एकमेकांना ओळखण्यासाठी आणि आव्हानं काय आहेत हे पाहण्यासाठी त्यांनी हे केलं.

“मी त्याला हजारो प्रश्न विचारले. तुझ्या अपार्टमेंटमध्ये व्हीलचेअर जाते का? लिफ्ट किती वेळा बंद पडते?” असे अनेक प्रश्न विचारले. लिफ्ट सहा महिन्यातून एकदा बंद पडते असा रिप्लाय त्याने दिला.

चेसच्या उत्तरांनी ती समाधानी होती. आनंदी तर इतकी होती की, त्या भरात तिने तिची अपॉइंटमेट आधी केली.

कायद्याच्या दृष्टीने बघायला गेल्यास या करारात कोणत्याही अडचणी नव्हत्या.

पश्चिम ऑस्ट्रेलिया मध्ये वेश्याव्यवसाय कायदा 2000 नुसार रस्त्यावर वेश्याव्यवसाय करणं आणि कुंटणखाना उघडणं हे बेकायदेशीर आहे. मात्र वेश्या होणं किंवा सेक्स वर्कर होणं कायद्याच्या विरोधात नाही. ऑस्ट्रेलियाच्या निरनिराळ्या भागात निरनिरनिराळे नियम आहेत.

युकेमध्येही असेच नियम आहेत. लैंगिक कृत्यासाठी पैसे देणं कायदेशीर आहे. नॉर्दन आयर्लंड मध्ये कुंटणखाना चालवणं बेकायदेशीर आहे.

जेव्हा मेलानी चेसकडे आली तेव्हा परिस्थितीची तिला हळूहळू कल्पना येऊ लागली होती.

“माझ्याकडे फारसं लैंगिक ज्ञान नव्हतं, पण तज्ज्ञ माझ्यासमोर उभा होता.”

जेव्हा ती भेट पुढे जाऊ लागली तेव्हा मेलानीला एक साक्षात्कार झाला.

“मी विकलांगता या विषयात तज्ज्ञ होते आणि चेसला याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही यावर खूप हसलो, दोन तासात आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो.”

चेस या उद्योगात सहा वर्षं आहे. नवीन क्लायंटकडून अवास्तव अपेक्षा ही खूप मोठी अडचण आहे, असं त्याला वाटतं. आनंदासाठी लोक काहीही दबाव टाकतात असं ते म्हणतात.

“इतर नात्यांप्रमाणेच हेही नातं कसे पुढे जाणार याचे आडाखे बांधावे लागतात.” तो म्हणाला.

चेस येण्याच्या आधी मेलानीला आपलं शरीर कसं साथ देईल याची कल्पना नव्हती. तिला योग्य पोझिशन घेता येईल का? तिला आनंद मिळण्याच्या ऐवजी थकवा येईल का अशा अनेक चिंता तिला भेडसावल्या.

म्हणून मी चेसला बुक केलं आहे, असं तिने सांगितलं. मला बार मधून एखाद्या पुरुषाबरोबर जायचं नव्हतं जिथे गोष्टी विचित्र वळण घेतील.

त्यानंतर तिला लक्षात आलं की तिचे पाय विचित्र वागू शकतात. तसंच ती पलंगावरून पडू शकते. तसंच तिच्या हात मोकळे होण्यासाठी तिला फिजिओथेरपीची गरज आहे.

“माझ्या पायाची हालचाल वेगवान झाली पाहिजे असं माझ्या लक्षात आलं आणि मग नंतर काही काळजी नाही.”

यावरून नियंत्रण कोणाचं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

मॅलानी

फोटो स्रोत, Melanie

अपंग स्त्री म्हणून ती त्या घरात अतिशय अस्वस्थ होती. मी पहिल्यांदाच डॉक्टर सोडून एखाद्या पुरुषासमोर नग्न होते असं ती म्हणाली.

अशा प्रकाराचे आघात सहन केलेल्या लोकांबरोबर चेसने याआधी काम केलं आहे. तिच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं हे त्याचं प्राधान्य आहे असं तो म्हणाला.

या अनुभवांमुळे मेलानीला एक वेगळ्याच प्रकारचं बळ मिळालं आहे. चेसकडे बुकिंग केलं तेव्हा मी सुरक्षित आहे हे मला माहिती होतं. मला काही व्यवस्थित वाटलं नाही तर तो तिथेच थांबेल याची खात्री आहे असं ती म्हणाली.

त्याने तसं केलं नसतं तर तिने त्याला पुन्हा बुक केलं नसतं असं ती म्हणाली. तर आपण करत असलेल्या कामाचं मला चांगलंच समाधान मिळत असल्याचं चेसचं म्हणणं आहे.

“लोकांना वेगवेगळे अनुभव मिळावे असं कोणाला वाटत नाही? एखाद्याला छान वाटावं असं वाटत असेल तर मी तिथे का नसावं?” असा प्रश्न तो च्येस विचारतो.

या सर्व अनुभवांमुळे माझा आत्मविश्वास अनेक पटीने वाढला आहे. आणि अशा क्षणांची मोजदाद करता येत नाही, असं मेलानीचं महणणं आहे. तिला आलेले अनुभव आता तिला इतरांना सांगायचे आहेत.

“मी आधी काहीही बोलण्यास कचरायचे. पण या एका गोष्टीने माझ्या आयुष्यात खूप फकत पडला. मी स्वत:वरच खूप खूश आहे हे सांगताना मी थकत नाही. माझ्या चेहऱ्यावचं हसू जाता जात नाही,” ती सांगते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)