आयफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्याने काय होईल?
आयफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्याने काय होईल?
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्पर्धेत सहभागी होत आता अॅपल कंपनी त्यांच्या सिरी व्हॉईस असिस्टंट आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ओपनAI कंपनीचं ChatGPT आणणार आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या अॅपलच्या मुख्यालयात कंपनीची वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 10 जूनला पार पडली. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने Siri नव्या रूपात आणण्यासोबतच इतरही काही नवीन फीचर्स कंपनीने जाहीर केली.
या नव्या पर्सनलाईज्ड AI प्रणालीला - Apple Intelligence असं नाव देण्यात आलं असून अॅपल युजर्सना अधिक सोपेपणाने अॅपलची डिव्हाईसेस वापरता यावी हा यामागचा उद्देश्य असणार आहे.
अॅपलला ओपन ए.आय.ची मदत का घ्यावी लागली? AIच्या स्पर्धेत अॅपल कंपनी मागे पडलीय का? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट - अमृता दुर्वे
- निवेदन - सिद्धनाथ गानू
- एडिटिंग - निलेश भोसले






