आमिर खानचा जावई नुपूर शिखरे कोण आहे आणि तो काय करतो?

आमिर खानची मुलगी आयरा खान फिटनेस ट्रेनर असलेल्या नुपूर शिखरेसोबत विवाह बंधनात अडकली.

फोटो स्रोत, Spice PR

फोटो कॅप्शन, आमिर खानची मुलगी आयरा खान फिटनेस ट्रेनर असलेल्या नुपूर शिखरेसोबत विवाह बंधनात अडकली.
    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान फिटनेस ट्रेनर असलेल्या नुपूर शिखरेसोबत विवाह बंधनात अडकली. आयरा खान ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्त यांची मुलगी आहे.

आमिरने दोन लग्न केली असून त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत तर दुसरी पत्नी किरण रावपासून एक मुलगा आहे.

सुपरस्टारची मुलगी असूनही आयरा खान बॉलिवूडच्या झगमगाटापासून नेहमीच दूर राहिली आहे. आयराने तिच्या वडिलांचं स्टारडम आणि ओळख बाजूला ठेऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आयरा खान अगात्सू या एनजीओची संस्थापक आणि सीईओ आहे. ही संस्था लोकांच्या मानसिक आरोग्य आणि निरोगीपणासाठी समर्पित आहे.

नुपूर शिखरे देखील फिटनेस विश्वातील एक मोठं नाव आहे. नुपूर शिखरे एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे.

रनिंग शॉर्ट्स वर आली नवऱ्याची वरात

बॉलीवूडमध्ये आजकाल हाय प्रोफाईल लग्न होतात. भरजरी कपडे, वेडिंग डेस्टिनेशन आणि डेकोरेशन याविषयी चर्चा असते. मात्र एवढा तामझाम नसूनही नुपूर शिखरे आणि आयरा खानचं लग्न चर्चेत आहे.

वेडिंग डेस्टिनेशनवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी दोघांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये कोर्ट मॅरेज केलं आणि सोबतच एक छोटेसं रिसेप्शनही ठेवलं.

नवरा मुलगा लग्नात शेरवानी घालतो पण तर नुपूर शिखरेने शॉर्ट्स आणि बनियान घातले होते. त्यांचा हा अवतार पाहून लोकांना प्रश्न पडला की स्वतःच्याच लग्नात असा कोणी अवतार करतं का?

त्याचा हा लूक आता व्हायरल झाला असून नुपूर शिखरेचं नाव रातोरात चर्चेत आलंय. नुपूरचा हा अवतार अनेकांना आवडला असून काही जणांनी यावर टीकाही केली आहे.

आमिर खानच्या मुलीचं लग्न

फोटो स्रोत, Spice PR

त्याच्या लग्नातील कपड्यांमुळेच चर्चेत आलाय असं नाही तर त्याने घेतलेल्या आणखीन एका निर्णयामुळेही तो चर्चेत आलाय. त्याने लग्नाच्या ठिकाणी जायला घोडा किंवा एखादी महागडी गाडी घेतली नाही. तर आपल्या नववधूपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने सांताक्रूझ ते वांद्रे असं जॉगिंग केलं.

8 किलोमीटर जॉगिंग करताना त्याने काळी बनियान आणि सफेद रनिंग शॉर्ट घातली होती आणि त्याच कपड्यांमध्ये त्याने नोंदणीकृत विवाह देखील केला.

नुपूर आणि आयरा या दोघांच्या लग्नाचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा जावई नुपूर शिखरे कोण आहे आणि तो काय शिकलाय, काय करतो हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये लागली आहे.

कोण आहे नुपूर शिखरे?

नुपूर शिखरेचा जन्म पुण्यात झाला. त्याने मुंबईच्या आरएस पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली.

नुपूर एक फिटनेस कोच आणि सल्लागार देखील आहे. त्याचं फिटनेस विश्वात मोठं नाव आहे. त्याने अनेक बॉलिवूड स्टार्सना फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे.

नूपूर आमिर खानसह इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा पर्सनल ट्रेनर आहे. अनेक वर्ष तो सुष्मिता सेनचा पर्सनल ट्रेनर होता.

नुपूर हा आयरा खानचाही ट्रेनर होता. त्यांच्या फिटनेस प्रवासादरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सुमारे 2 वर्षांत त्यांचं नातं आणखीन घट्ट झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

आमिर खानच्या मुलीचं लग्न

फोटो स्रोत, Spice PR

पहिली भेट 2020 मध्ये झाली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नुपूर शिखरे त्याच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचे अनेक व्हीडिओ आहेत.

त्याला 30 हजारपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. 2020 मध्ये आयरा खान आणि नुपूरची पहिली भेट झाली होती.

लॉकडाऊन दरम्यान, आयरा तिच्या वडिलांच्या घरी राहण्यासाठी आली होती, त्याच दरम्यान नुपूरची आणि तिची भेट झाली.

फिटनेस ट्रेनिंग दरम्यान दोघे चांगले मित्र बनले आणि नंतर प्रेमात पडले. सप्टेंबर 2022 मध्ये नुपूरने सायकलिंग इव्हेंट दरम्यान आयराला लग्नासाठी मागणी घातली.

साखरपुड्याच्या एका वर्षानंतर आता दोघांचं लग्न झालं आहे. लग्नाला आमिर खानच्या दोन्हीही पत्नी उपस्थित होत्या, तर आयराचा भाऊ जुनैद आणि लहान भाऊ आझाद देखील उपस्थित होते. नुपूरचंही संपूर्ण कुटुंब लग्नासाठी हजर होतं.

नुपूर एका सामान्य महाराष्ट्रीयन कुटुंबातला मुलगा आहे. त्याला त्याचं लग्न अगदी साधेपणाने पार पाडायचं होतं.

त्यामुळे कोणताही देखावा न करता त्याला सर्व विधी शांततेने पार पाडायचे होते आणि तेच घडलं.

नुपूर आणि आयराचं अनोखं लग्न कौतुकाचा विषय ठरला असून ते आता लोकांसाठी उदाहरण बनले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)