मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्याचा आधार घेतला ते 'हैदराबाद गॅझेट' काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्याचा आधार घेतला जातो, ते हैदराबाद गॅझेट काय आहे?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्याचा आधार घेतला ते 'हैदराबाद गॅझेट' काय आहे?

मराठा आरक्षण आंदोलनात हैदराबाद गॅझेट चर्चेत आहे. मराठा-कुणबी एकच आहेत याचा पुरावा म्हणून या गॅझेटचा आधार घेतला जातो आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी घेऊनच मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक 29 ऑगस्टपासून आंदोलन करत आहेत.

महाराष्ट्र सरकारनंही या हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची तयारी दाखवली आहे. ओबीसी वर्गातून मात्र याला विरोध होतो आहे. पण ज्या हैदराबाद गॅझेटचा वारंवार उल्लेख होतोय, ते नेमकं काय आहे? त्याबाबत काय दावा केला जातो?

याविषयी बीबीसीच्या दीपाली जगताप यांनी मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक बाळासाहेब सराटे यांच्याशी बातचीत केली.

( बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)