तीन वेळा ऑलिम्पिक गाठणारी कुस्तीपटू ते आमदार, विनेश फोगाटचा संपूर्ण प्रवास एका क्लिकवर
तीन वेळा ऑलिम्पिक गाठणारी कुस्तीपटू ते आमदार, विनेश फोगाटचा संपूर्ण प्रवास एका क्लिकवर
तीन वेळा ऑलिम्पिक गाठणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतासाठी अनेक पदकं जिंकली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं.
तिने एशियन गेम्समध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक जिंकलं तर कॉमनवेल्थ खेळांमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकली.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनाचा ती एक प्रमुख चेहरा होती. सिंह यांच्यावर महिला पैलवानांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.ब्रिजभूषण सिंह हे सर्व आरोप फेटाळतात.
2024 मध्ये, विनेश हरियाणातून काँग्रेस पक्षाची आमदार झाली.






