कार आणि टू-व्हीलरचं उत्पादन करताना कामगारांची बोटं आणि हात का तुटत आहेत?
पुणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. तिथे जगभरातील नावाजलेल्या ऑटोमोबाईल कंपनींच्या वाहनांचं उत्पादन होतं.
पण या वाहनांसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स तयार करण्यासाठी भोसरी, पिंपरी चिंचवड, खेड अशा अनेक ठिकाणी छोटे-छोटे कारखाने आहेत. तिथं काम करताना सतत अपघात होतात.
यामुध्ये कामगारांना त्यांचे हात आणि बोटे चिरडली जातात. त्यामुळे ते आयुष्यभरासाठी अपंग होतात.
या कामगारांसाठी कार्य करणाऱ्या सेफ इन इंडिया फाऊंडेशनच्या मते, त्यांच्या नोंदीत असलेल्या जखमी कामगारांपैकी तब्बल 78 टक्के केसेस या ऑटोमोबाईल कारखान्यांमधील आहेत.
याठिकाणी पॉवर प्रेससारख्या मशीन्स बहुतेक वेळा बेकायदेशीरपणे चालवल्या जातात. अपघातानंतर या कामगारांच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.
तसंच अशा मशीनवर काम करणाऱ्या महिलांना अपघाताचा अधिक धोका असल्याचं दिसून आलं आहे.
पाहूयात याबाबत बीबीसी प्रतिनिधी गणेश पोळ यांचा ग्राऊंड रिपोर्ट.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन





